दोसतार - ५०
छाती भरून आली . आपण खरेच शिवाजी महाराजांचे कोणीतरी सैनीक आहोत असे वाटत होते. त्याच धुंदीत घरी आलो. रात्री मामा ,आईला सांगत होता. विन्याला या दिवाळीत किल्ला करता येणार नाही म्हणाला म्हणून मुद्दाम हा किल्ला दाखवला. गण्या एल्प्या टंप्या मी आमच्या मनातली दिवाळी कधीच संपणार नव्हती.दिवाळीची सुट्टी संपली . शाळा सुरू झाली. सुट्टी संपल्याच्या म्हणजे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी शाळेत पटकन जावे आणि अजिब्बात जाऊ नये असे आलटून पालटून दोन्ही वाटत होते. वस्तु ज्या स्थितीत आहे त्याला त्या स्थितीत रहावेसे वाटते. हा न्यूटनचा नियम इथेही लागू होतो.
मिसळपाव