शेवटची चूक.
शेवटची चूक.
प्रेम माणसाला किती असहाय बनवते नाही का ? आता माझ्या सारखा मध्यमवयीन माणूस आणि तो सुद्धा लंडन मधील एक प्रथितयश डॉक्टर असा कसा काय वागू शकतो? मी म्हणजे डॉक्टर राहुल.माझे लग्न झालेले आहे आणि एक अतिशय प्रेमळ आणि सुंदर बायको आहे मला .एक गोड मुलगी सुद्धा आहे. तीन वर्षाची . त्यांना जर हे सगळे कळले तर ते काय म्हणतील ? मी काही कामासाठी पुण्याला आलो आहे इतकेच त्यांना माहित आहे.
माझ्या बायकोला माझे लग्ना आधीचे प्रेम माहित आहे . मी लग्ना आधीच तिला रीना बद्दल सांगितले होते.
रीना. तिचे नाव घेतले तरी अजून पोटात कालवाकालव होते. तिला सुद्धा असेच होत असेल का ?
मिसळपाव