Skip to main content

टिक टिक

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 21/06/2020 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
मेकॅनिकल घड्याळ म्हणजे मोठा कुतूहलाचा विषय. माझ्या बालजिज्ञासेत भर पडली ती वडिलांना घड्याळाची सर्जरी करताना पाहून. सर्जरीच म्हणावी लागेल त्याला. डोक शांत ठेवून आयग्लास मधून एकटक पाहत धारदार चिमट्याने घड्याळातील स्प्रिंगच्या डबीतून स्प्रिंग जराही न वाकवता अलगद वेगळी करणे आणि दुरुस्त करून परत जशीच्या तशी ठेवणे ज्याला जमले त्याला कदाचित एखादी मेंदूची शस्त्रक्रियाही लीलया जमून जाईल. मनगटी घड्याळ म्हणजे गुंतागुंतीचं मशीन अगदी त्यांच्या इंग्रजी ब्रँड नावांसहित... एचमटी, हँडो सांडो, राडो, फावर लुबा, इत्यादी. हे कानावर शब्दशः 'पडलेले' शब्द, लहानपणी जेवढे वेचून ऐकले तेवढेच लक्षात राहिले.

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 21/06/2020 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा:~ भिक्षुकी/पुरोहितपणा/भटजीगिरी, हा या अभिवाचनाचा गाभा आहे... पण तरिही,यातले अनुभव मांडणारा जो कुणी भटजी आहे,तो मी (स्वतः) नसून,आमच्यातल्या अनेक सर्वसामान्य भटजींचं ते एकत्रित व्यक्तित्व आहे असे समजावे!

स्मृतीची पाने चाळताना: एक

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 21/06/2020 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.

माैन

लेखक मी-दिपाली यांनी रविवार, 21/06/2020 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांचा प्रवास काहीच फर्लांग माैनाचा थांग निरंतर...॥ शब्दांचा अर्थ कळे यथामती माैनाची महती कोणा कळे ॥ शब्दांचे शस्त्र जिव्हारी घाव अंतरीचा ठाव माैन घेई ॥ शब्दांचे धन उजळली आभा माैनाचा गाभा अंधारात ॥ शब्दांचे नाते नांदे जिव्हेसंगे मनासवे रंगे माैन परि ॥

जीजी

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 21/06/2020 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. कित्येक वेळा छोट्या छोट्या घटना, गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वायुष्यात नेतात. ह्या घटना एखाद्या दिव्याच्या बटनाप्रमाणे असतात, बटन दाबले की लख्ख प्रकाश पसरतो तसे आपल्याला काहीतरी अचानक आठवते. जीजी म्हणजे माझी आजी, तिच्या विषयीची खालील आठवण ही अशीच एका रेडिओ प्रोग्रॅमवरून जागृत झाली. जीजी आज सकाळी ऑफिसला येताना एन.पी.आर. रेडियोवर (ह्युस्टनचे लोकल रेडिओ स्टेशन) एक ‘स्टोरी कोर’ नावाचा कार्यक्रम ऐकला. तसा तो दर शुक्रवारी ब्रॉडकास्ट होतोच म्हणा पण आज ऐकायचा योग आला.

असा भास होतो

लेखक मनोज यांनी शनिवार, 20/06/2020 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आभास होतो कसा त्रास होतो तू येत आहे असा भास होतो स्मरतो गजरा केसात माळलेला माझा कसा मोगरा श्वास होतो डोळ्यात जादू तिच्या पेरलेली जो पाहतो तो तिचा दास होतो कळायचे मला ती न बोलताही साथी कधी तोच मी खास होतो असे कुणी का इतके आवडावे जो जीवनाचा खरा ध्यास होतो

पुस्तक परिचय - The Great Game

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 20/06/2020 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
(पुस्तकाचा परियच करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच दोन भागात हा पुस्तक परिचय देत आहे.) पुस्तक : The Great Game लेखक : Peter Hopkirk ग्रेट गेम म्हणजे काय? ग्रेट गेम हा शब्द जरी रुडयार्ड किपलींग या इंग्रजी लेखकाच्या किम या पुस्तकामुळे लोकप्रिय झाला असला तरी त्याआधी सुद्धा हा शब्द वापरण्यात आला होता. एकोणवीसाव्या शतकात ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांच्यात मध्य आशियावर वर्चस्व ठेवण्यासाठी जो संघर्ष झाला त्यालाच ग्रेट गेम असे नाव दिले गेले.

रूटीनाच्या रेट्यातही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 20/06/2020 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
रूटीनाच्या रेट्यातही कधी थोडं वेडं व्हावं दवबिंदूत इवल्या ओलं ओलंचिंब व्हावं कानठळी कोलाहली अंतर्नादी गाणं गावं प्रमेयाच्या पंखाखाली व्यत्यासांना विसरावं चारोळीनं महाकाव्य पचवून ढेकरावं धीट शून्यानं शतदा अनंताला हाकारावं
काव्यरस

दोसतार -५२

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/06/2020 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
घरी संस्कृत गोष्टींचे पुस्तक नव्हतेच. आज्जीची पुस्तके होती पण ती देवाची होती. त्यात गोष्टी नव्हत्या. हरिविजय , गोपिकाष्टकम , महाभारत रामकथासार अशी होती. आणि आज्जीला त्या गोष्टी माहीत होत्या आई ती पुस्तके वाचायची पण तीला त्यातील गोष्टी माहीत नव्हत्या. नाही म्हणायला संगीत मंदारमाला नावाचे एक नाटकाचे पुस्तक होते पण ते मराठीत . संस्कृत नाही. कुठेतरी सापडायलाच हवी संस्कृत गोष्ट. मागील दुवा http://misalpav.com/node/47035 संस्कृत पुस्तके दुकानात पण मिळत नाहीत. जी काही मिळतात ती श्लोक आणि कसल्याशा पुराणांची.

राजयोग - १७

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 19/06/2020 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१५ राजयोग-१६ *** अनेक व्यक्तीगत कारणांमुळे पूर्ण करायची राहून गेलेली ही मालिका सर्व वाचकांची माफी मागून पुन्हा सुरु करीत आहे. सर्व रसिक वाचक मोठ्या मनाने मालिकेला पुन्हा प्रतिसाद देतील अशी आशा आहे. या भागात फक्त भाग सोळा आणि पंधराची लिंक देते आहे. पंधराव्या भागात अनुक्रमणिका असल्याने मागचे भाग सहज उपलब्ध होतील. या काळात ही मालिका पूर्ण करावी म्हणून प्रोत्साहन देणार्या सर्व मिपाकरांचे अनेक आभार.