Skip to main content

काही सुभाषिते

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 12/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत सुभाषितांपासून प्रेरणा घेऊन मीदेखील काही सुभाषिते तयार केली आहेत, ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चूका मनावर घेऊ नका. अजून मी संस्कृत शिकत आहे.

संत - कुसुमाग्रज (एक विलक्षण अनुभव)

लेखक मानस यांनी मंगळवार, 12/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक मिसळपावकरांनो, ही कविता मी "महामानवाला प्रणाम!" ह्या अंतर्गत प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. एका वरिष्ठ मित्राच्या बर्‍याच आग्रहामुळे येथे पुन्हा देत आहे. थोडे फार फेरबदल (जसे आठवले, तसे) केले आहेत. माझे मित्र श्री. भाऊ मराठे ही कविता अतिशय सुंदर सादर करतात. बाबांच्या निर्वाणाची बातमी वाचली, तेव्हा ह्या कवितेची खूप आठवण झाली आणि म्हणुनच हा सगळा अट्टाहास. काही वर्षांपुर्वी (खूप वर्षांपुर्वी) कुसुमाग़्रजांनी नाशिकमध्ये श्री. बाबा आमटे ह्यांचा सत्कार घडवून आणला होता.

शिशिरमासी

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 11/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बालकवींची अप्रतिम निसर्गकविता "श्रावणमासी हर्ष मानसी" ही आमची प्रेरणा.
Taxonomy upgrade extras

आम्ही कोण २ (शार्दूलविक्रीडित)

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 11/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंतांच्या आम्ही कोण पासून प्रेरणा घेऊन आणि (अर्थातच) केशवसुत,केशवकुमार इत्यादींच्या ओळी चोरून ही चारोळी समर्पित करतो... आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी संचारू मनसोक्त वायुलहरींवरती पुन्हा एकदा पादाक्रांत करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा (कृपया र्‍हस्व-दीर्घाच्या चुका काढू नका.त्या मला माहीत आहेत. चारोळी जरा बरी वाटली, तर आणखीन पुढे विस्तार करावयास हरकत नाही. उत्साह असल्यास कृपया शार्दूल-विक्रीडित न मोडता करावी)
Taxonomy upgrade extras

पत्रास कारण की...

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 11/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
परम मित्रवर्य सुशील, सर्वप्रथम आम्ही आमच्या अतिशय छोट्या अशा आंतरजालीय पत्राबद्दल बद्दल तुमची माफी मागतो. परंतु तुम्हास लिहिते करण्याचा आम्हासमोर हा एक उत्तम पर्याय होता. (आणि तसंच झालं. तुम्ही एकदम स्फोटक अस प्रती उत्तर दिलंत.) तुमची आमच्याबद्दलची तक्रार एकदम रास्त आहे . आम्ही याहूवर सचेत दिसत असताना तुम्हास कधी प्रती उत्तर केलं नाही. परंतु बरेच वेळा आम्ही आमचा याहू सचेत सोडून आम्ही घरी निघून जायचो. नाही म्हणायला तुमचे अचेत संदेश आम्हाला दिसायचे. परंतु काही तांत्रीक कारणास्तव आम्हाला आपणास उत्तर देणे जमायचे नाही. असो . आमचे सर्व क्षेम कुशल आहे.

आग लागो, `तसल्या' नजरेला!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 11/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!) ज्या वाक्‍यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्‍य. परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्‍य डोळ्यासमोर नाचत होतं.

रव्याचे थालिपिठ...

लेखक प्राजु यांनी सोमवार, 11/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रव्याचे थालिपिठ... वेळ : ३० मिनिटे वाढणी : २-३ जण साहित्य : १. रवा - १ कप २. तांदूळ पिठी - २ कप ३. बारिक चिरलेला कांदा - १/२ वाटी ४. कोथिंबिर चिरलेली - मूठभर ५. हिरव्या मिरच्या एकदम बारिक चिरलेल्या - ३-४ ६. मीठ, धने-जीरे पावडर. ७. दहि ( आंबट गोड कसलेही) - १ ते १ १/२ वाटी कृती : १. प्रथम कांदा, कोथिंबीर, आणि मिरच्या एका बाऊलमध्ये घेऊन त्याला थोडे मीठ हाताने मळल्यासारखे लावून ३-४ मिनिटे ठेवावे. २. तांदूळपिठी, रवा आणि धने जिरे पावडर एकत्र करून घ्यावे. ३. या मिश्रणात आता मिठ लावून ठेवलेले कांदा-मिरच्या घालावे, पुन्हा चांगले मळावे. ४. आता यात थोडे थोडे दहि घालून मळून घ्यावे.

संडे स्पेशल ( व्हेज लसाने)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 10/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक इटालियन पदार्थ (पास्ता प्रकारात मोडणारा) आहे. साहित्यः लसाने :८ रेडीमेड लसाने शीट्स.( ३ इंच बाय ६ इंच) पालकः२० पाने देठ काढून ब्लांच करणे नंतर पाणी काढून टाकणे. चीजः ५० ग्रॅम चेडर चीज (ब्रिटानिया) ५० ग्रॅम मोझारीला (अमुल) टोमॅटो सॉसः ३टे.स्पून तेल (किंवा ऑलिव्ह ऑइल) १ ढोबळी मिरची बारीक चिरलेली १/२ किलो टोमॅटो (ब्लांच करुन , साल काढून बारीक चिरलेले) १/२ टी.स्पून ओरेगानो (वाळलेले चालेल) १/२ टी.स्पून काळी मिरी पावडर ( ताजी) २टे.स्पून टोमॅटो प्युरी १ टी.स्पून साखर १/४ कप कोथिंबीर (किंवा बासिल) मीठ चवीनुसार व्हाईटसॉसः ३ टे.स्पून बटर ३ टे.स्पून मैदा २चिमूट जायफळ पूड (नसले तरी च

आम्ही कोण?

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 10/02/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, "आम्ही कोण?" या प्रश्नावर केशवसुत, केशवकुमारांपासून ते केशवसुमारांपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या असतील.
Taxonomy upgrade extras