माझे अभंग माझी गाथा
तात्यांनी केशवा, टेक युअर ओन टाईम पण येऊ दे एखादे फर्मास विडंबन... असा आदेश सोडला होता, पण मायदेशी परतण्याच्या गडबडीत खरोखरच टाईम जास्त गेला
आमची प्रेरणा नंदन यांची अप्रतिम कविता तिचे अभंग तिची गाथा..
एक तो 'वीकांत' | तेव्हाव्ही आकांत |
झोपाया निवांत | मिळेचिना ||
उशीरा झोपणे | उशीरा उठणे |
निवांत लोळणे | आळशी मी ||
हसावे मिशीत | थोड्याशा खुशीत |
उशी ही कुशीत | घोरताना ||
मिसळपाव