पत्रास कारण की...
परम मित्रवर्य सुशील,
सर्वप्रथम आम्ही आमच्या अतिशय छोट्या अशा आंतरजालीय पत्राबद्दल बद्दल तुमची माफी मागतो. परंतु तुम्हास लिहिते करण्याचा आम्हासमोर हा एक उत्तम पर्याय होता. (आणि तसंच झालं. तुम्ही एकदम स्फोटक अस प्रती उत्तर दिलंत.)
तुमची आमच्याबद्दलची तक्रार एकदम रास्त आहे . आम्ही याहूवर सचेत दिसत असताना तुम्हास कधी प्रती उत्तर केलं नाही. परंतु बरेच वेळा आम्ही आमचा याहू सचेत सोडून आम्ही घरी निघून जायचो. नाही म्हणायला तुमचे अचेत संदेश आम्हाला दिसायचे. परंतु काही तांत्रीक कारणास्तव आम्हाला आपणास उत्तर देणे जमायचे नाही.
असो . आमचे सर्व क्षेम कुशल आहे.
आम्ही सध्याच्या आस्थापनेत व्यवस्थित स्थिरावलो असून सारं काही उत्तम चालले आहे. आम्ही पुणे नगरामध्ये गृह खरेदी केले आहे आणि लवकरच आमची नेमणूक आस्थापनेच्या पुणे कार्यालयात करून घेण्याच्या विचारात आहोत.
आपली अचानक आठवण येण्यास कारण की, पुढच्या शनिवारी आम्ही एक वर्षासाठी आमच्या आस्थापनेच्या ग्राहकाकडे कामगिरिनिमित्त अमेरिका देशी जात आहोत.
आमचं सदर अमेरिका देशी जाणं आमच्या दृष्टीने एक कर्तुत्वाचि गोष्ट आहे. आणि आम्हास या ध्येयापर्यंत पोहोचवण्यात ज्यानी हातभार लावला त्यामध्ये आपणही आहात. आम्हास आजूनही आठवतं, आपण आमचे पदव्युत्तर शिक्षणाचे सहाध्याई असताना शिक्षण शुल्क भरण्यास मदत केली होती. आणि त्यामुळेच आम्हास आमची पूर्वीची चाकरी मिळाली आणि तिथुनच आमच्या उत्करषास सुरूवात झाली. आपले आम्हावर उपकार आहेत अस बोलणं हे आपल्या सद्भावनांचा अपमान ठरेल आणि ते आमच्याकडून कदापि होणार नाही.
सांगणं एव्हधच आहे की, आपला मायेचा हात असाच आमच्या पाठीशी राहावा.
आपले क्षेम कुशल जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
कळावे,
लोभ असावा.
वाचने
5411
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
छान आहे पत्र..
आदरणीय गावडे सर ,
In reply to आदरणीय गावडे सर , by प्रसाद गोडबोले
जरुर लिहा. :)
अरेच्चा...!!!!
In reply to अरेच्चा...!!!! by प्रचेतस
या आमच्या मिपा-बाललीला आहेत
In reply to या आमच्या मिपा-बाललीला आहेत by सतिश गावडे
बघता बघता आम्ही मिपा-आठ
In reply to बघता बघता आम्ही मिपा-आठ by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
तीव्र निषेढ
अवधुत गुप्ते आठवुन गेला..
In reply to अवधुत गुप्ते आठवुन गेला.. by जेपी
.
हम्म :)
+1
हे आधी पाह्यलंच नव्हतं. आणि
पत्र भावले
मजेदारच.