मक्याचा खरवस
साहित्य - एक वाटी मक्याचे दाणे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी बारीक केलेला गूळ, वेलचीपूड, केशर.
कृती - मक्याचे दाणे व दूध एकत्र मिक्सरमधून वाटून घ्यावे. त्यात गूळ विरघळवून घ्यावा. वेलचीपूड व केशर घालावे. एरवी खरवसासाठी चीक उकडून घेतो त्याप्रमाणे शिटी न लावता कुकरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात. सध्या जवळजवळ वर्षभर स्वीटकॉर्न उपलब्ध असल्याने झटपट करता येण्याजोगा हा पदार्थ आहे. लहान मुलांनाही आवडेल.
मिसळपाव
ण्याचा एक प्रयत्न.....

