Skip to main content

विषकन्या (पूर्ण)

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 25/10/2008 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागील वेळी पूर्ण न लिहीता, ईस्नीपचा ऑडियो टाकला होता. त्यामुळे काहींची गैरसोय झाली होती.
Taxonomy upgrade extras

या रे या!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/10/2008 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाही मार्गाने चर्चेने आणि प्रबोधनाने महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्याचा उपदेश करण्यार्‍या सर्वांसाठी...! ही कविता (बालकवींची क्षमा मागुन) समर्पित....! या भैयांनो या रे या... लवकर भर भर सारे या मजा करा रे मजा करा हि मुंबई तुमची समजा ! स्वस्थ बसे आणि फसे तोची खरा मराठी असे नवि झोपडी बांधा या... या नगराला लागुनिया ! गिरगांव दहिसर भैयांना मसजिद मुलुंड बाकिच्यांना वाढती गर्दी गाड्यांना फौज दिसेना कोणाला ! चपलगति बिहारी येति "हे" आले "ते" आले.. तर मग मुंबई सोडूनिया आपणच शोधू नवि दूनिया....!
Taxonomy upgrade extras

"मेल्यावर जीवाचं काय होतं?"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 24/10/2008 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मेहूणी हेमा माझ्या पत्नी पेक्षा तशी बरीच वयाने लहान.गेले कित्येक वर्ष ती आपल्या नवर्‍याबरोबर इंग्लंडला एडिंबरा इथे राहाते.आता ती आजी झाली आहे तिची नातच पाच वर्षाची झाली आहे. ह्या गणपतिच्या सणाच्या दिवसात ती तिच्या नातीला घेऊन आमच्याकडे महिनाभर राहायला आली होती.तिच्या नातीला गणपती उत्सव कसा साजरा करतात हे तिला दाखवायचं होतं. एक दिवशी बोलता बोलता आमचा विषय निघाला की, "मेल्यावर जीवाचं काय होतं?" हेमाला गेल्या वर्षाचा एक जुना प्रसंग आठवला.ती म्हणाली, "मला काय वाटतं आणि त्यावेळी काय घडलं ते तुम्हाला आठवून आठवून सांगते." प्रस्तावना करताना ती म्हणाली, "मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह

पेन्सिल रेखाटन

लेखक वर्षा यांनी शुक्रवार, 24/10/2008 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आवडती हिरॉईन रेखाटायचा एक फसलेला प्रयत्न! माध्यमः Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil -वर्षा

नाही तर नाही.... जा!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 24/10/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खालील गझल मी मायबोली च्या गझल कार्यशाळेसाठी लिहिली होती. नाही रदिफ घेऊन लिहायची होती गझल. गझल लिहिण्यासाठी महत्प्रायास करावे लागले आणि अजूनही लागताहेत. ही गझल कार्यशाळेसाठी पाठवल्यावर तिच्यात १-२ बदल करून संयोजकांनी तिला निर्दोष गझल असे जाहीर केले आणि माझा जीव भांड्यात की मतल्यात पडला.. खरंतर, गझलेच्या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यापूर्वीही जवळ जवळ २ ते २.५ महिने मी गझल लिहिण्याचा अखंड प्रयत्न करत होते.. त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे.
Taxonomy upgrade extras

आगंतुक पाहुणा

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 24/10/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री झोपायला म्हणुन खोलीत आलो. पलंगपोस बदलावा म्हणुन घातलेला पलंगपोस काढणार तेव्हढ्यात लक्ष बिछान्यावर विराजमान झालेल्या पाहुण्याकडे. पाहुणा घर आपलच समजुन मस्त मजेत बिछान्यावर फिरत होता. हिरवेगार तुकतुकीत अंग, पंखांना तपकिरी काठ, साधारण एक सेंटिमिटर आकार, पंख मिटुन घेतलेले असा पाहुणा सोयिस्कर जागेची पाहणी करत असावा हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला.

राजच्‍या अटकेमागील 'राज'कारण

लेखक विकी शिरपूरकर यांनी शुक्रवार, 24/10/2008 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे नेते राज ठाकरे यांच्‍या अटकेच्‍या फार्सवर सतत दोन दिवस चाललेल्‍या घडामोडींनंतर आता पडदा पडला आहे. या घडामोडींवर आता पडदा पडला असला तरीही गेल्‍या दोन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्‍या घडामोडींची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून रंगणे साहजिकच आहे. या चर्चेचे गु-हाळ फिरणार आहे, ते राज यांच्‍या अटकेमुळे नेमका फायदा कुणाचा या मुद्याभोवती. ठाकरी शैलीतून आणि शिवसेनेच्‍या आक्रमक मुशीतून तयार झालेल्‍या राज यांच्‍यासाठी अशा प्रकारची अटक तशी फारशी नवी नाहीच. यापूर्वीही त्‍यांनी अनेक आंदोलने केले आहेत. आणि त्‍यांनाच काय खुद्द बाळासाहेबांनाही अटकेला सामोरे जावे लागले आहे.

गोष्टी माणसांच्या

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
तो तसा ऊंचीने बेताचाच,पण अत्यंत कुशाग्र बुद्धीचा.त्याच्यापेक्षा वरच्या वर्गात शिकणारी मुलं त्याच्याकडे शंका घेऊन येत.भौतिकशास्त्र आणि गणित हे त्याचे आवडते विषय.... तो तसा गरीब घराण्यातला,पण घराणं सुशिक्षीतांच होतं,त्याचे वडील व्यवसायाने शिक्षक होते.. त्याच्या वर्गातील सर्वच मुले कुठल्या ना कुठल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यास उत्सुक होती.त्यातल्या त्यात बुद्धीमान मुलं ही IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करत.आपल्या मित्रांबरोबर हयानेही IIT च्या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरला.ह्या मुलांना मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं किंवा फ़ारशी पुस्तकही नव्हती त्यांच्या जवळ.म्हैसूर गावातल्या एका दगडी

द याकूबियन बिल्डिंगच्या निमित्ताने...

लेखक विसुनाना यांनी शुक्रवार, 24/10/2008 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
सदर चर्चा येथे टाकण्यापूर्वी मिपा व्यवस्थापनाची रीतसर परवानगी घेतली आहे.. परवाच एन्डीटीव्ही ल्युमिएर चॅनेलवर "द याकूबियन बिल्डिंग" (Arabic: عمارة يعقوبيان) हा चित्रपट दाखवला. इजिप्तमधली ढासळती नैतिक परिस्थिती दाखवणारी ही 'अला एल्-अस्वानी' यांची कथा कैरोतील एका बिल्डिंगमध्ये घडते.