विलास देशमुखांना खुले पत्र !
विलास देशमुखांना खुले पत्र.
बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना "माननीय" असे संबोधण्याची प्रथा आहे. पण आपणाबाबत आता असे म्हणावेसे वाटेनासे झाले आहे. गेल्या काही वर्षात आपण व आपल्या पक्षाने महाराष्ट्राचे नक्की काय भले केले काही कल्पना नाही. मुंबईत बड्या बिल्डरांचे मॉल्स आलेत, गिरणगावातून मराठी हद्दपार होतेच आहे, शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, विजेचा प्रश्न तसाच, टाटांची नॅनो महाराष्ट्राला हुलकावणी देऊन गुजराथाला निघून गेली. गेली काही वर्ष आपण मुंबईला शांघाय करण्याच्या वावड्या उठविल्या होत्या.
मिसळपाव