Skip to main content

चष्मा !

लेखक चाफा यांनी सोमवार, 27/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे सुध्दा तुम्ही चष्म्यासकट वाचत असाल तर माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे आहेत. गेले कित्येक दिवस या चष्म्याने मला नकोसे करुन टाकलेय. रात्री एकतर झोपच लागत नाही नाहीतर स्वप्नात चष्मा येउन मला जाग येते. काम करताना उगीचच नजर अधु झाल्यासारखी वाटते. समोर कुणी चष्मा लाउन बसलेलं असेल तर माझं लक्ष कामातुन निघुन तिकडे जातं आणि मग झालेल्या चुका शोधताना डोळ्यांच्या मदतीला चष्मा नसतो. मुळात या चष्मा प्रकरणाचा शोध कुणी लावला? जगातल्या नक्की कोणत्या व्यक्तीला `जगातला पहीला चष्मिष्ट' अशी प्रसिध्दी मिळाली?

आंतरजालावरील वाचनीय..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/10/2008 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, दिवाळीच्या मुहूर्तावर "आंतरजालावरचे वाचनीय" हे एक नवीन सदर सुरू करण्यास मिसळपावला आनंद होत आहे.. आज मनोगत, उपक्रम, मायबोली, अनेक मराठी ब्लॉग्स, इत्यादी मराठी संकेतस्थळांवर बरेच काही लिहिले जात आहे. मग ती एखादी उत्तम कविता असो, एखादा ललितलेख असो, किंवा एखादी वाचनीय व माहितीपूर्ण चर्चा असो.. आपल्यातले काही मिपाकर हे मिपासोबतच आंतरजालावर इतस्तत:ही फिरत असतात.

नाडीग्रंथ ताडपट्टीच्या त्या फोटोचे इतके महत्व ते काय ?

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 27/10/2008 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
नाडीग्रंथ ताडपट्टीच्या त्या फोटोचे इतके महत्व ते काय ? नाडी ग्रंथांच्या ताडपत्रावरील मजकुराबाबत चर्चेचा विषय लाऊन धरलेला काही वाचकांचा अपवाद सोडता फारसा विचारात घेण्यासारखा किंवा वैचारिकतेने आनंददायी वाटत नाही. याचे कारण म्हणजे त्यांची ज्योतिषशास्त्राबाबत नकारात्मक मते आहेत. त्यांच्या वैचारिक बैठकीमुळे फलज्योतिषाला वा अन्य भविष्यकथनाच्या विधांना विरोध करणे स्वाभाविकपणे घडते. अशा मनोधारणेतून त्या लोकांना नाडी ग्रंथ हे भविष्यकथनाचा प्रकार असल्याने ते थोतांड असणार असे खात्रीपुर्वक वाटते वा मानावेसे वाटते. त्यामुळे या विषयावर अनेकांच्या अपेक्षित प्रतिक्रिया आल्या.

सावध रहा.........

लेखक वेताळ यांनी सोमवार, 27/10/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
आईसलैड्,पाकिस्तान,हंगेरी,अर्जेंटिना,बेलारस,युक्रैन आदी देशानी दिवाळखोरी जाहिर केलेली आहे.आर्थिक संकट जगावर खुपच गडद होत चालले आहे. नवीन गुंतवणुक करताना विचारपुर्वक करावी.पैसा बचत करणे ,दैनदिन खर्चात काटकसर करणे आदी गोष्टीवर भर द्या. पाकिस्तानात ४५ रुपये किलो गव्हाचे पिठ झाले आहे.अल्ला त्याना सदबुध्दी देवो. सनातन्याला आनंद झाला असेल वेताळ

पहा पटलं तर!!!!

लेखक धोंडोपंत यांनी सोमवार, 27/10/2008 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आपण सर्व मराठीप्रेमाने बांधले गेलेलो आहोत. त्यामुळेच आपण मिसळपाववर येतो. वाद घालतो, भांडतो, चेष्टामस्करी करतो, कविता ऐकवतो, विचार मांडतो, आनंद लुटतो. आपणा सर्वांना येथे एकत्र आणणारा धागा म्हणजे महाराष्ट्रावरील आणि मराठीभाषेवरील आपले प्रेम. किंबहुना मिपाकरांचा उद्देशच मुळी ज्यांना मराठीत संवाद साधायचे आहे, त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे हाच आहे. जो जो महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम करतो, तो मराठी. त्याचा धर्म कोणताही असो. त्याच्या घरात जर मराठी भाषा बोलली जात असेल तर तो मराठी. विविध धर्मीय लोक महाराष्ट्रात आहेत. जे मूळचे महाराष्ट्रातीलच आहेत.

उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला

लेखक सनातन यांनी सोमवार, 27/10/2008 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
हिंमत असेल, तर दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करा ! कल्याण, २६ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी सिमी व दहशतवादी यांच्या तळावर हल्ले करावेत, असा सल्ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. माननिय श्री. उद्धव ठाकरे याचे अभिनदन...!!!

दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

लेखक mina यांनी सोमवार, 27/10/2008 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपापरिवारास माझ्याकडून दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा...
मांगल्याची आस दे कल्याणाचा ध्यास दे दिव्या दिव्या माझ्या घरी मन भर प्रकाश दे, मुक्त मोकळा श्वास दे , आनंदाची रास दे, स्वप्नासाटी माथ्यावरती झळझळते आकाश दे.. दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.!!

सहज सुचलं म्हणून

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 27/10/2008 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
सजणा! माझ्या दुनियेत दोन दिवस राहूनी प्रीतिसागरात पोहलो असतो दोघे मिळूनी निष्टूरा! जाणार होतास जर दूर मला सोडूनी का नाही गेलास प्रीतिचे दोन शब्द बोलूनी
Taxonomy upgrade extras

मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 26/10/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे. ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद आहेत. परूळ्याला आमच्या घराचं दैवत आदिनायण,त्या दैवताचं पुरातन मंदीर परूळ्यात आहे.ते पहाण्यासाठी मी अलीकडे गेलो होतो. मंदिरातल्या पुजार्‍याने मला रमाकांत परूळेकरांची ओळख करून दिली.आणि त्यांच्याच घरी मी दोन दिवस राहयला होतो.ह्या मुक्कामात