Skip to main content

कवच कुंडले

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 12/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
ड्ब्ल्यु.एच्.ओ. मधला कामाचा ३ रा दिवस. एकंदरीत कामाचे स्वरुप फारसे कळले नव्हते. टीम मीटींग ला बोलावणे आले. व्यासपिठावर दिग्गज मंड्ळी बसली होती. साहेब आल्यावर सगळी उठून उभी राहिली. आम्ही पण सलामी दिली. त्यांनी "टेक युवर सिट" म्हट्ल्यावर बसलो बापडे. हे स्पेशल ऑफिसर टू गवरमेंट ऑफ इंडिया फॅमिली प्लॅनिंग होते.पहिल्याच वाक्यात आमची दाणादाण उडाली. एकंदरीत आपला साहेब सोलकर आहे हे लगेच समजले. त्यांच्या भाषणाचा साधारण गोषवारा खालीलप्रमाणे: If anyone of you is a pancy foot quit today. There is no room for weaklings here. You have joined worst possible profession for living. So quit today.

स्फोटात फाटलेले डबे

लेखक ग्रीष्म यांनी बुधवार, 12/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्फोटात फाटलेले डबे बदलले जातील उद्या कदाचित..... रक्ताचे ते थेंब... मासांचे ते तुकडे .... अन घाबरलेले ते रुळ बदलले जटिल उद्या कदाचित ... मानसं कोम्बुनं घेतील स्वताला पुन्हा त्याच डब्यात उद्या कदाचित ... दारावर सुरु असेल मारामारी आत चिंता चौथ्या सिट साठी ...उद्या कदाचित पुन्हा दादर महिम जोगेश्वरी बोरीवली अन मिरारोड़सगळी स्टेशन पुन्हा उभी असतील रांगेत उद्या कदाचित ....
Taxonomy upgrade extras

पाण्याच्या थेंबासाठी

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 12/11/2008 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी वाया घालवू नका असे मुलांवर ओरडतांना आठवत असते मी..माझ्यातल्या एका मुलीला.. आज नळ आला नाही .. .. दोन हातात बादल्या धरून मोठ्या बंगल्याला वळसा घालून शेजार्‍याच्या मालकीच्या विहिरीवर पाण्यासाठी जाणार्‍या.. लहान भाऊ तेव्हा अनेक प्रश्न विचारून भंडावत असे मला.. तासभर रांगेत चुळबुळत राहिले की पाणी मिळेल या आशेवर मान घाली घालून उभी राहयचे मी भावाचा हात धरून भरलेल्या बादल्या घरी नेतांना लोक बघतात ही जाणिव आतल्या आत ओढायची.. ओढलेला चेहरा हासरा ठेवण्याच्या प्रयत्नात फ्रॉकवर सांडलेल्या पाण्याचे भान यायच ...जेव्हा मीच बघायचे माझ्याकडे तिर्‍हाइताच्या नजरेने.. विहिरीच्या दगडी काठाला आपटत आ
Taxonomy upgrade extras

फ्राइड राइस

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 12/11/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
भाज्या-१ .५ वाटी कोबी लांब चिरुन, गाजरे १/२ वाटी लांब पातळ चिरुन, १/२ वाटी फरसबी चौकोनी चिरुन, १/२ वाटी मटारदाणे,१/२ वाटी फ्लॉवर बारीक चिरुन, लाल,पिवळी,हिरवी पैकी सर्व किवा ज्या असतील त्या ढोबळी मिरच्या लांब,पातळ चिरुन -सगळ्या मिळून साधारण वाटीभर,२ कांदे लांब चिरुन, २ कांदापाती बारीक चिरुन. आले बोटभर बारीक चिरुन, ५/६ लसूण पाकळ्या बारीक चिरुन, ४/५ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन, सोया सॉस १ च. चमचा २ टेबलस्पून तेल,मीठ व अजिनोमोटो चवीनुसार २ वाट्या तांदूळाचा पाणी कमी घालून भात जरा फडफडीत शिजवून घ्यावा.

इंधनाची दरकपात.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 12/11/2008 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर निचांकाच्या पातळीवर पोहोचले आहे असे मी वाचले. ( ५६ डॉलर्स प्रति पिंप). काही महिन्यापूर्वी पिंपाचे दर १२६ डॉलर्स झाले तेंव्हा केंद्र शासनाने तडकाफडकी ५५ रुपये प्रति लिटर अशी दर वाढ करुन महागाई वाढवली होती आणि आज इतके दर कमी होऊनही प्रंतप्रधान आणि मंत्री ( देवरा) हे मात्र प्रशासकिय उत्तरे देत आहे. तेल कंपन्याचा तोटा पाहु इत्यादी इत्यादी. केंद्र शासनाने जर इंधनाची दरवाढ कमी केली ( जी तार्किक आणि सुसंगत आहे) तर गरिब लोकांना महागाईचा विळख्या पासून थोडा आराम मिळेल, त्यांचे जीवन सुसह्य होईल. सध्या केंद्र शासनावर कोणाचा धाक राहिला नाही.

सांगू वडीलांची किर्ती.

लेखक हेमंत बर्वे यांनी बुधवार, 12/11/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
गेले बरेच दिवस मिपावर मी मुलांचे शिक्षण,करीअर.पालक आणि त्यांचे मानसशास्त्र ,समुपदेशन या विषयांवरचे लेख अलीप्तपणे वाचत होतो. अलीप्तपणे अशासाठी की मी ह्या सगळ्या कचाट्यातून नुकताच बाहेर पडलो आहे. माझी मुलगी व्यावसायीक शिक्षणक्रम पूर्ण करून नोकरी ला लागली आहे. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तेव्हा रामदास मला नेहेमी आठवण करून द्यायचे की " हेमंत तू शिक्षकाचा मुलगा आहेस.(माझे आई आणि वडील दोघंही शिक्षक होते.) आणि खासकरून नानांचा विषय निघाला की रामदास परत आठवण करून द्यायचे . उद्या १३ नोव्हेंबर रोजी माझे वडील मुकुंद दामोदर बर्वे यांची पुण्यतिथी.

आम्ही आणी क्रेडिट कार्ड वाली कन्या !!

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 12/11/2008 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.) वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत) कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक. आम्ही :- जय महाराष्ट्र !

मराठी बाणा...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 12/11/2008 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आमच्या ब्लॉगवर गुगलच्या ऍडसेन्सकरता आम्ही अर्ज केला होता. तो अर्ज नामंजूर करणारे आम्हाला आलेले त्यांचे पत्र खालीलप्रमाणे.. Hello Chandrashekhar Ramchandra Abhyankar, Thank you for your interest in Google AdSense.

मिसळपावचा सेवाप्रदाता...

लेखक सरपंच यांनी बुधवार, 12/11/2008 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळपासून मिसळपावचा सेवादाता आलेल्या अतिथिंच्या मागणीचा पुरवठा करता करता त्रासून गेला होता. त्यामुळे सदस्यांना मिसळपाव बघता येत नव्हते. आता मिसळपाव व्यवस्थित आहे. मात्र सोबतच सेवादात्याची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. आज किंवा उद्या मिसळपाव पुन्हा असेच चालु बंद असू शकते. त्यामुळे कृपया त्रास करून घेऊ नका. मिसळपाव उघडायला त्रास होतो म्हणून ज्यांनी ज्यांनी आज संपर्क साधला त्या सर्वांचे धन्यवाद. मिसळपाव वर तुमचे प्रेम असेच कायम राहो. मिसळपाव अधीकाधीक सक्षम होत राहील. धन्यवाद.

दर्शन भारत मातेचे

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 12/11/2008 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक वेळी भारतात जायचं म्हटलं की तो दिवस उजाडण्याची उक्तंठा लागून राहिलेली असते. विमानात बसल्यावर वाटतं की किती हळू हळू उडत आहे हा उडन खटारा! भारतात गेल्यावर काय काय करायचं याचे बेत मनात गर्दी करत असतात. घरी गेल्यावर दार कोण उघडेल. आई का भाऊ का वहिणी? आई-वडिलांच्या डोळ्यांच्या पानावलेल्या कडा, त्यांचे गोंजारणे, पाठीवरुन त्याच मायेने फिरणारा आजीच्या थरथरत्या हाताचा मायेचा स्पर्श, भावंडांच्या भेटीतला आनंद, मध्येच एखाद्या बहिनीचेही पानावलेले डोळे चोरुन पुसणे, "किती मोठी झाली आहे गं तू" असं आईचं तिच्या नातीला लाडानं बोलनं... मन अगदी अधीर होतं देशात पोहचण्यासाठी. तसच मागच्या भेटीतही झालं.