गुन्हा आणि शिक्षा
नमस्कार मंडळी,
गुन्हा आणि शिक्षा यावर गेले काही दिवस माझ्या मनात विचार येत आहेत. मिपाकर या विषयी त्यांची मते मांडतील तर मला मदत होईल.
श्री. बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका अनुभवकथना नंतरच्या प्रतिसादांत 'ऑनर किलिंग' बद्दल प्रतिसाद आले. एखाद्या स्त्री अथवा पुरुषाला समाज दोषी ठरवून अतिशय कठोर अशी शिक्षा देतो. त्या शिक्षांचे प्रकार वाचून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते प्रकार अमानुष, असंस्कृत आहेत असे म्हटले. खरोकरच माणसाला मारण्याचे ते प्रकार वाचून मन सुन्न होऊन जाते.
मिसळपाव