एक जुनी कविता: सहज आठवली म्हणून
जेव्हा जेव्हा वारे
युद्धाचे वाहती
जवान नाहती
कौतुकात
शत्रूच्या भयाने
होतो थरकाप
मुखी आपोआप
राष्ट्रगीत
थंडी नि वार्यात
झुंजती जवान
शब्दांचेच दान
त्यांना द्यावे
आणि कोणी वेडे
हुतात्मेही होती
त्यांची देशभक्ती
गौरवावी
संपताची युद्ध
त्यांना विस्मरावे
आपण रमावे
आपल्यात
रात्रंदिन त्यांना
युद्धाचा प्रसंग
नेते सारे दंग
स्वार्थामाजी
Taxonomy upgrade extras
मिसळपाव