मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोई दुष्मन ठेस लगाये....

विकास · · काथ्याकूट
किशोर कुमारने म्हणलेले खालील गाणे आज मला या अस्वस्थते आठवत आहे: चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये, सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये? ... मजहार मे नैय्या डुबे तो माजी पार लगाये, माजी जो नाव डुबोये उसे कौन बचाये? ... कोई दुष्मन ठेस लगाये, तो मीत जिया बेहेलाये, मनमीत जो घांव लगाये उसे कौन मिटाये? वर दिलेल्या सर्वच पण विशेष करून शेवटच्या ओळी मला सारख्या डाचत आहेत. कारण? अतिरेकी हल्ला चालू असताना थरथरणारे आपले आबा पाटील आता पोलादी पुरूष होऊन काय म्हणत आहेत? - "बडे शेहरोंमे ऐसे एखाद हादसे होते रहते है. वो ५००० लोगोंको मारने आये थे, हमने कितना कम नुकसान होने दिया!" कधीकाळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे अभिमानाने म्हणणार्‍या या महाराष्ट्रात आज सैह्याद्रीच्या मदतीला असणारे नेत्रूत्व साध्या टेकडीची उंची पण गाठू नये ह्या विचाराने अस्वस्थता येते. आता दुसरे उदाहरण - ज्या उद्योजकाबद्दल सर्वसाधारणपणे चांगले ऐकले आहे, आदर वाटू शकेल असे व्यक्तीमत्व आहे ते रतन टाटा काय म्हणताहेत ते पहा. त्यांचे म्हणणे आहे की :
"It's ironic that we did have such a warning, and we did have some measures," Tata said, without elaborating on the warning or when security measures were enacted. "People couldn't park their cars in the portico, where you had to go through a metal detector." However, Tata said the attackers did not enter through the entrance that has a metal detector. Instead, they came in a back entrance, he said.
आता बोला काय म्हणणार याच्या पुढे? त्रैराशिक मांडा - असे जर टाटांचे तर इतरांचे काय असेल? आता ठिगळं लावता येणार नाहीत....

वाचन 2365 प्रतिक्रिया 0