Skip to main content

तू दिलेल्या वेदना

लेखक जयवी यांनी सोमवार, 01/12/2008 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तू दिलेल्या वेदना मी गात नाही ती उधारी चुकविणे नशिबात नाही पेलणे गांडीव तुजला शक्य नाही मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही भोगण्याचा शाप आहे नंदिनीला आजही का आग प्रतिकारात नाही जी नशा युद्धातल्या मरणात आहे ती नशा लाचार या जगण्यात नाही उंब-याशी थांबले पाऊल माझे स्वागताला आसवे दारात नाही का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

अक्कलेचे तारे

लेखक स्नेहश्री यांनी सोमवार, 01/12/2008 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सहज मिड-डे च्या एका लेखाने माझे लक्ष विचलीत केले. जगात माणस काहीही अक्कलेचे तारे तोडु शकतात आणि ते पेपरवाले अतिशय आनंदाने कसे छापतात त्याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणजे खालील लेख आहे. http://www.mid-day.com/news/2008/dec/011208-Farah-Khan-Ali-Mumbai-Terro…

आर. आर. आबांचा राजिनामा?

लेखक अनंत छंदी यांनी सोमवार, 01/12/2008 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मुख्यंत्र्यांकडे राजिनामा सुपूर्द केल्याची फ्लॅश न्यूज द हिंदू च्या वेबसाईटवर दिसते आहे.

आपत्कालीन परिस्थितीत काय करावे ?

लेखक सातारकर यांनी सोमवार, 01/12/2008 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
जर अशी परिस्थिती उद्भवली तर अशा वेळी नक्की काय करावे, कोणत्या व्यवस्थेला सर्वप्रथम कळवावे, कसे कळवावे. ते लोक येईपर्यंत आपला आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. कोणी किंवा आपण स्वत या धावपळीत जखमी होउ नये (हे जास्त होतय :) ) जर कोणी जखमी झाले तर प्रथमोपचार नक्की काय करावेत. या आणि अशा गोश्टिंविशयि, मिपावर कोणी लष्कर किंवा पोलीसातील असेल किंवा वैद्यकीय व्यवसायातील असेल तर त्यांच मार्गदर्शन इतर मिपावासियांना उपयोगी पडू शकेल.

"तो"- जागतिक एड्स दिना निमित

लेखक sanjubaba यांनी सोमवार, 01/12/2008 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
शापित झालीय भुमी त्याच्या अस्तित्वान आज फिरतोय तो शिस्तीत..... श वा गा रा त न.......... एक नागवा वेडा उभा असावा समोर तसा "तो" वावरतो य वेश्ये च्या वस्तीत...... आणि त्याच्या ओढाळ पण मांगल्य भासणार्‍या डोळ्याने खुणा करतोय "तो" तुम्हा-आम्हाला पण फसतो मात्र सवैरचारी मस्तीत......... याच मस्तीत द्डलाय मृत्यू-गंध ज्याने येईल अंतिम वेळ आणि जळाल मतलबी चादं न्या सोबत...... राहील रात्र निसतब्ध नुसती च....... गर्भावतीची ही होऊ दे साक्ष हे शापित क्षितिज कमळ नको उमलू देऊ.... तरच होईल तुझ्या जीवनाची सिद्धता जरी राहतील बाकी तुझ्या अस्तीच.........
Taxonomy upgrade extras

विमान उपलाब्ध नव्हते म्हणुन कमांडोंना यायला उशीर झाला ?

लेखक अप्पासाहेब यांनी सोमवार, 01/12/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या विमानतळावर कोणत्याही क्षणी पाहीले तर किमान पाच तरी विमाने उड्डाणाच्या तयारीत दिसतील, त्याही वेळी असतील, त्यातलेच एक ताब्यात घेता आले नसते का? देशाच्या सुरक्षे पुढे काही प्रवाश्यांची गैरसोय किरकोळ आहे, इंडियन, जेट, किंगफिशर सर्व विमान कंपन्यांनी हे सह्कार्य नक्की दिले असते. दिल्लीतील एकालाही हे सुचु नये याचे आश्चर्य वाटते. मुंबई, बेंगलुरु, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद सारख्या मह्त्वाच्या शहरांत सुसज्ज कमांडो पथके नसावीत ह्या पेक्षा मोठी बौध्दिक दिवाळखोरी कोणती?

यानंतर तरी महाराष्ट्र पोलीसांना अत्याधुनिक साधने मिळतील काय?

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 01/12/2008 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यातील भ्रष्ट आर्थिक व्यवहारावर प्रकाश टाकणारी ही बातमी पहा. आता यानंतर तरी उपलब्ध (बहुतेक पुरेशा) रकमेचा योग्य विनियोग होईल, आणि महाराष्ट्र पोलीसांना अत्याधुनिक साधने मिळतील, याची खात्री करता येईल काय? परदेशात पोलीस यंत्रणा आधिक दक्ष आणि सुसज्ज असल्याचं बरेचदा दाखवून देण्यात येतं (इथे मिसळपाव वर देखील), आता अशीच सुसज्जता मुंबईतही पोलिसांना मिळावी यासाठी लोकांचा खर्चावर वचक राहील अशी काही योजना होऊ शकेल काय?

हॅट्स ऑफ टू लिलीयन

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 01/12/2008 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
एखादे पुस्तक वाचल्यानन्तर त्यातील पात्रे आपल्याला भेटली तर किती बरे असे वाटत रहाते. आणि जर ते पुस्तक तुमच्या आवडत्या पुस्तकापैकी असेल तर मग विचारायलाच नको. "चीपर बाय डझन" हे पुस्तक मी प्रथम किर्लोस्कर मासीकातुन तुकड्यातुकड्यात वाचले. मग नन्तर कधितरी ते आख्खे पुस्तक हातात लागले. आजतागायत त्याची पारायणे झाली तरी मनातुन अजून् सुटले नाही. चीपर बाय डझन ही बारा भावन्डे आणि त्यांचे आईवडील यांची खरी कहाणी. त्या बारा भावंडांपैकी दोघानी सांगितलेली.

कसं काय पाटील बरं हाय का

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 01/12/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... सातार्‍याचे तुमी, तासगावचे तुमी, ते न्हाय न्हाय न्हाय लातूरचे तुमी सांगा आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. काल म्हनं तुमी मीटिंगला गेला. मॅडमना राजीनामा देऊन आला. केली कुनी खोडी, गेली लाल गाडी. आज काय शिल्लक र्‍हायलंय का..! आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... दिल्लीमधे जवा बाँबस्फोट झाला. तीन तासात तीन सूट बदलून आला. हाय काय कोडं, सांगा तरी थोडं. खाली नका बगू आता लाजताय का..! काल काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का.. काल काय ऐकलं

सुट्टी..!

लेखक संदीप चित्रे यांनी सोमवार, 01/12/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टीला गावी जायचं ठरतं आणि शीळेला गाणं मिळतं रजेचं कसं, काम आहे किती? पैशांची सोय आहे का पुरेशी? पाहून प्रश्न जरा दडपते छाती मिळताच रजा गणित जुळतं आणि शीळेला गाणं मिळतं....१ जाताना पूर्वी त्यांच्या गावी तान घ्यायचे वडील छानशी पोहचायचे ते मनाने आधी कळतं त्यांना काय व्हायचं आणि शीळेला गाणं मिळतं....२ गणपती नाही, दिवाळी तरी लग्नकार्य वा नुसती भेट जरी वाढत असते खरेदीची यादी घरचं अंगण अनमोल वाटतं आणि शीळेला गाणं मिळतं....३ कुठली जिलबी, कुठली भाजी सुरमई, बांगडे,पापलेटं ताजी बिघडलं पोट चालेल तरीही भेळ, मिसळ, वडाही खायचं आणि शीळेला गाणं मिळतं....४ दाराशीच वाट बघते आई कौतुक करतील सासूबाई भाऊबहिण
Taxonomy upgrade extras