Skip to main content

पुन्हा जिवंत परत आले तर

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 03/12/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा जिवंत परत आले तर मरण अटळ आहेच... रोज जीव वाचला याच समाधान मिळावे असेही घडते.. पण जगायच कस ते ठरवता आल असत तर?
Taxonomy upgrade extras

कोण कोम???

लेखक सुनील मोहन यांनी बुधवार, 03/12/2008 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले. मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे.

पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 03/12/2008 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया हे पाहा - http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&eurl= (कृपया यूट्यूबची चित्रफीत येथे परस्पर चिकटवू नये. तसे करण्यामुळे बर्‍याचदा आ ई उघडायला त्रास होतो. कृपया फक्त दुवा द्यावा. - आणिबाणीचा शासनकर्ता.) मुंबईत झालेल्या गहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकीस्तानी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत पाकड्यांनी मारलेल्या उलट्या बोंबांचे हे विडीओ.

पाकड्यांनी २० दहशतवादी भारताच्या हवाली करण्यास नकार दिला......

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 03/12/2008 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मटा मध्ये आलेल्या ताज्या बातमीनुसार "पाकड्यांनी " भारताला वेगवेगळ्या केसमध्ये असणारे २० दहशतवादी हवाली न करण्याची आडमुठी भुमिका घेतली आहे. बघुया आता आपले सरकार काय करतयं? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3787763.cms

नविन संगणक विषाणु पासुन सावध

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 03/12/2008 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
आजच नविन संगणक विषाणु विषयी माहिती मिळाली, ती आपणा पर्यंत पोहोचवण्यासाठी हि उठाठेव. तज्ञ लोकांनी ह्या बाबत अजुन माहिती व काय सवधगिरी घ्यावी हे सांगावे हि विनंती. संदर्भ :- http://www.esakal.com/esakal/12032008/SpecialnewsBE52E56E19.htm

अजुन मी...

लेखक राघव यांनी बुधवार, 03/12/2008 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.

एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ

लेखक धनंजय यांनी बुधवार, 03/12/2008 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
येथे श्री कलंत्री यांनी चालू केलेल्या गांधीवादी लेखमालेच्या अनुषंगाने मी हा प्रतिसाद (वेगळे चर्चासत्र म्हणून) देत आहे. श्री. कलंत्री यांनी सुचवलेली कार्यवाही मला पटलेली नाही, पण मी येथे पूर्णपणे त्यांच्या समर्थनार्थ लिहिणार आहे. या संकेतस्थळावर श्रद्धेच्या महतीबद्दल गप्पा मारणार्‍यांनी एका अश्रद्ध माणसाकडून हे ऐकून घ्यावे - श्री कलंत्री यांची श्रद्धा धाडसी आहे, आणि नि:शस्त्र लोकांना गोळ्या घालणार्‍या श्रद्धावानांसारखी भ्याड नाही. श्री. कलंत्री यांना "तुम्ही अतिरेक्यांचे मतपरिवर्तन करायला जा" म्हणणारे लोक स्वतः काय करू इच्छितात? त्यांनी स्वतः वर्दी चढवलेली आहे?

भारतातील अधुनीक दहशतवादाची मुळे

लेखक विकास यांनी बुधवार, 03/12/2008 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत जे आत्ता अतिरेकी हल्ले झाले, तसेच गेल्या दशकापासून जे अनेक अतिरेकी हल्ले मुंबईत आणि भारतातील इतर शहरात झाले त्यासंदर्भात आपण येथे बर्‍याच चर्चा करत आहोत. त्याचे मूळ शोधताना हे जणू काही १९९२ सालानंतर अचानक चालू झाले असा सूर लागतो. आता त्यासंबंधात मी मला माझ्या काही माहीतीवर आधारीत जे काही माहीत आहे ते येथे लिहीत आहे. त्यात तथ्य आहे अथवा नाही हे तुम्हीच ठरवा. मात्र जे काही लिहायचे असेल ते भावनाप्रधान होऊन लिहीलेत तर चालू शकेल पण न आवडणार्‍याविरुद्ध भावनाशुन्य आणि आपल्याला जे वाटते तेच खरे असे भावनाविवश होऊन कृपया लिहू नये ही विनंती.

चंद्र-शुक्र-गुरू युती विरोधी चित्रे

लेखक विकास यांनी मंगळवार, 02/12/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळ मधे चंद्र-शुक्र-गुरू युतीचे सुंदर छायचित्र पाहीले. नंतर संध्याकाळी बॉस्टनच्या आकाशात तीच युती पहाताना चंद्र उलटा दिसला! छायाचित्र काढायचे राहून गेले पण आज ते सीएनएन वर दिसले.

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? -३

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 02/12/2008 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
तरुणपणी मी काही घोषणा ऐकत असे, हसके लिया पाकिस्तान और लढके लेंगे हिंदुस्थान. असे ऐकल्यावर माझे रक्त खवळत असे.बर्‍याच वेळेस शब्दांचा वापर आवश्यकतेपेक्षा नकळतच चांगला अथवा वाईट परिणाम साधत असतो.जसा जसा मी मोठा होऊ लागलो तेव्हा नकळतच त्यांची बाजू काय असावी किंवा काय असू शकते यावर थोडाफार कयास, तर्क बांधू लागलो. तेव्हा मला असे वाटले की ही घोषणा अशी असायला हवी होती, लढके लिया पाकिस्तान और हसके लेंगे हिंदुस्थान. अशी जर घोषणा असती तर?