पुन्हा जिवंत परत आले तर
मरण अटळ आहेच...
रोज जीव वाचला याच समाधान मिळावे
असेही घडते..
पण जगायच कस ते ठरवता आल असत तर?
कदाचित मरण्याआधी एकदातरी जिवंत
परत येता आल असत तर
येथे जिवंत माघारी आले तर येईन -
वाघिणीसारखी रुबाबात पण
गरजवंताचा कोथळा बाहेर काढणार नाही
अशी नखे आणि दात घेऊन
जिवंत राहिले आणि परत आले तर येईन-
मानेवर रुतून
न बसणार्या अलंकाराशिवाय
बघता येईल जग
पण कुण्या शेळीप्रमाणे मॄत्यूची वाट न बघता..
यदाकदाचित जिवंत परत आले तर येईन
एक व्यक्ती म्हणून-
बस ट्रेनमधून लोंबकळणारी
घरातून निघतांना, रस्त्यावर चालतांना
घरात बाहेर पायदळी तुडवली जाणारी -
कीडामुंगी म्हणून नाही
याउप्पर जिवंत राहिले तर परत येईन
जीवन देणार्याची कृतज्ञ म्हणून..
येईन अनेकांच्या हिताचा विचार करून .
त्यासाठीच जन्म आहे म्हणून..
- सोनाली जोशी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1933
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
छान !!!
सुरेख..
कविता आवडली
भावना पोहोचल्या, फक्त ..