पाकिस्तानने भारतीयांवर केलेली चिखलफेक
आत्ताच मला ईमेल ने आलेल्या ह्या लिंक्स पाहिल्या….आणि धक्काच बसला. पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यावर्चा परामर्ष घेण्यात आला आहे. त्यात ज्या दोन व्यक्तिंच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत त्यापैकी एकाने सदर हल्ला भारतीय लष्करानेच केलेला आहे आणि पाकिस्तानवर उगाचच आरोप केला जात आहे असा जावईशोध लावला आहे. दुसर्या व्यक्तिने तर हल्ला भारतात झाला आहे; भारतात स्वत:च्या इतक्या बंडखोर चळवळी चालू असताना पाकिस्तानवर आरोप करताना भारताने विचार करायला हवा. शिवाय त्यांच्याकडे तसे काही पुरावे असतीलच तर त्यांनी त्यांचा ( रॉ ) ऑफिसर इथे पाठवायला हवा पुरावे घेऊन. आमच्या माणसाने तिथे का जावे ?
मिसळपाव