तरुणपणी मी काही घोषणा ऐकत असे, हसके लिया पाकिस्तान और लढके लेंगे हिंदुस्थान. असे ऐकल्यावर माझे रक्त खवळत असे.बर्याच वेळेस शब्दांचा वापर आवश्यकतेपेक्षा नकळतच चांगला अथवा वाईट परिणाम साधत असतो.जसा जसा मी मोठा होऊ लागलो तेव्हा नकळतच त्यांची बाजू काय असावी किंवा काय असू शकते यावर थोडाफार कयास, तर्क बांधू लागलो. तेव्हा मला असे वाटले की ही घोषणा अशी असायला हवी होती, लढके लिया पाकिस्तान और हसके लेंगे हिंदुस्थान. अशी जर घोषणा असती तर? अर्थातच हसके लेंगे साठी पाकिस्तान्यांनी अथवा मुस्लिमांनी आदर्श वागण्याची काही तत्त्वे पाळली असती तर कदाचित अतिरेकाकडे त्यांना जावेही लागले नसते आणि त्यांचा कार्यभागही साधला गेला असता. पाकिस्तानातील अथवा पाकिस्तानधार्जिण्या मुस्लिम लोकांनी खरे तर यावर विचार / आचार केला असता तर?
यशवंतराव चव्हाणांचे एक वक्तव्य मननीय आहे, भारतात अनेक आंदोलने होतात, कधी कधी आंदोलक वैफल्यातून अथवा अति उत्साहातून विभाजनाची मागणी करतात. तमिळ वेगळ्या प्रांताची मागणी करतात, पंजाबी वेगळ्या प्रांताची मागणी करतात, बोडो,असामी वेगवेगळ्या प्रांताची मागणी / धमकी देतात. अशावेळेस सर्वसामान्य भारतीय असे वक्तव्य फारसे मनावर घेत नाही, पण मुस्लिमांनी असे काही वक्तव्य केले तर सर्वसामान्य माणूस लगेच मुस्लिम कसे देशविरोधी आहे यावर लगेच वक्तव्य करतात. कोणास ठाऊक हिंदू-मुस्लिम संबंधात भारतीय नकळतच जास्त संवेदनशील होत असतात कदाचित हीच या समस्येची बीज कहाणी असावी.
माझ्या लेखमालेच्या संदर्भात मी या ४/५ दिवसात बराच उलट सुलट विचार करीत होतो, प्रश्न विचारत होतो, उत्तरे शोधत होतो, एका प्रश्नाचे उत्तर मात्र मला मिळाले नाही, मला एकही मुस्लिम मित्र का नाही? कदाचित नोकरीमध्ये मुस्लिमांची संख्या कमी असावी, सांस्कृतिक जीवनात त्यांचा प्रभाव कमी असावा, नेमके कारण काहीही असो, मात्र आपणाला मुस्लिम मित्र नाही हे सत्य मला स्वीकारावेच लागले. ( अपवाद एक मुलगी आहे की तिला मी बहीण मानलेली आहे.) परतू जसे मला हिंदू मित्र आहे, ज्यांच्याशी मी चेष्टा, मस्करी, गप्पा, गुजगोष्टी करू शकतो तसा मात्र मुस्लिम मित्र मला नाही.
अतिरेकी असो अथवा शांतताप्रेमी पाकिस्तान नागरिक असो, आपले आणि त्यांचे कदाचित प्रत्येक मुद्द्यावर एकमत होणार नाही, पण संवाद नक्कीच झाला पाहिजे यात कोणाचे दुमत असू नये. त्यांच्यापर्यंत आपणाला पोहोचायलाच हवे.
सगळेच पाकिस्तानी हे अतिरेकी असतात असा कोणा पाकिस्तान विरोधी व्यक्तींचा पण दावा असणार नाही, असो याबाबत बरेच लिहिता येईल. सर्वात मुख्य म्हणजे आपला ( आपल्या सारख्या नागरिकांचा) पाकिस्तानीशी संवाद सुरू झाला पाहिजे.
जे कोणी अतिरेकी बनले आहेत कदाचित त्यांच्यावर तत्काळ आपला प्रभाव त्यांच्यावर पडणार नाही, पण तेथे असलेल्या शांतताप्रेमी, भारतपाक संबंध चांगले व्हावेत यावर विश्वास असणार्या लोकांचे हात आपण बळकट केले पाहिजे.
कदाचित यावर व्यक्ती म्हणून किंवा संस्था बनवून आपल्याला काहीतरी काम सुरू केले पाहिजे. आपली निष्क्रियता अतिरेक्यांना मूक संमतीच वाटते. माझ्या मते खालील गोष्टी करता येतील. अशा कार्यक्रमामुळे शांतताप्रेमी, बंधुभावावर विश्वास ठेवणारे यांना काहीतरी कार्यक्रम मिळेल.
१. सध्या एखादे भारत-पाक मित्रमंडळ अस्तित्वात असेल तर त्या मंडळाला आपण जोडून घेतले पाहिजे, नसेल तर त्याची निर्मिती केली पाहिजे.
२.भारतातून अशा नागरिकांना पाकिस्तानामध्ये जाण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच प्रमाणे पाकिस्तानामधील अशा समानविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे.
३.भारतात पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना उच्चशि़क्षणासाठी बोलावले पाहिजे, त्यासाठी असलेले विद्यावेतन, शिष्यवृती दिली पाहिजे.
४.पाकिस्तानामध्ये वैद्यकिय सेवा आपल्यासारखी प्रगत नाही. आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे.
५.भारत / पाक शासनाकडे प्रवाश्यांची देवाणघेवाण सुलभ आणि जलद होईल अशी प्रक्रिया राबवली पाहिजे. आजही अनेक मंदिरे, गुरुद्वारे पाकिस्तानात आहे. तसेच अजमेर शरिफावर अनेक पाकिस्तान्यांची भक्ति आहे. योग्य तो प्रचार केला तर साईबाबा हे भारत आणि पाक यांच्या भाविकाचे आदर्श भक्तिस्थान होऊ शकतील.
६.पंजाब आणि पंजाबी पाकिस्तानी लोकांचे सांस्कृतिक जीवन बरेच सारखे आहे. त्यांच्या मध्ये कला आणि कलाकारांचे आदानप्रदान जास्त प्रमाणात होईल अशी योजना आखली पाहिजे.
७.खेळ हा लोकांना चांगल्या पद्धतीने जोडत असतो. भारत पाक मध्ये क्रिकेट, हॉकी, कुस्ती, कबड्डी इत्यादी खेळ खेळले जातात. महाविद्यालयीन, हौशी आणि व्यावसायिक लोकांना वारंवार खेळण्याची संधी दिली पाहिजे. असे सामने आयोजित केले पाहिजे.
८.गरीब लोकांकडून अतिरेकी लोक होण्याची शक्यता जास्त असते. पाकिस्तानातील हुशार मुलांना शि़क्षणासाठी शिष्यवृत्ती देता येईल अशी योजना आखणे.
९.पाकिस्तानामधील वर्तमानपत्रात, मासिकात भारतातील हिंदू-मुस्लिम समाजाच्या चांगल्या भागाचे, सौहार्द, सहिष्णू वागण्याचे वास्तव दर्शन घडवले पाहिजे.
१०.भारतातील भागातून पाकिस्तानात त्यांच्या आवडीचे आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी कार्यक्रम घडवून आणावेत ( सध्या असे होत असावे असे मी ऐकतो, भारतातील दूरचित्रवाणीचे कार्यक्रम, चित्रपटाचे पाकिस्तानात बरेच चाहते आहेत असेही मी ऐकतो.)
११.माझ्या एका मित्राने सुचविले आहे की भारत आणि पाकिस्तानाची चलनव्यवस्था एक केली तरी बराच फरक पडू शकतो.
१२.दोन्ही देशातील व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
१३.अतिरेकी का बनतात, कसे बनविले जातात, त्यांची दिशाभूल कशी केली जाते, त्यांच्या दारिद्र्याचा आणि भावनांचा वापर कसा होतो याबाबत साहित्य निर्मिती होईल अशी योजना आखणे आणि त्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे.
१४.मुस्लिम आणि हिंदूधर्मग्रंथांतील साम्य याबाबत साहित्य प्रसिद्ध करणे.
१५.अतिरेकी हल्ल्यानंतर सामान्य आणि निरपराधांनाच जास्त झळ लागते. भारतातील अथवा पाकिस्तानातील पोळलेल्या लोकांच्या हकिकती प्रसिद्ध करणे.
१६.कोणताही धर्माचा अतिरेकी विचार इतर धर्माबद्दल असहिष्णू बनवत असतो. प्रत्येक धर्माच्या या बाजूबद्दल पुस्तके, साहित्य प्रकाशित करणे.
१७.भारत जर अखंड राहिला असता तर अखंड भारताचे स्थान आज महासत्तेच्या अग्रभागी राहिले असते. भारत, पाक आणि बांगलाच्या विभाजनाने आपण काय गमावले आणि काय गमावत आहोत याचा सातत्याने प्रचार करत राहणे.
१८.जगात अनेक ठिकाणी पाक आणि भारतातील विद्यार्थी, नागरिक, नोकरीदार एकत्र राहत असतात. त्याच्यांमध्ये सामंजस्य निर्माण होईल यासाठी मंडळे स्थापन करणे.
१९.बांगला देश आणि बंगालमध्ये रविंद्रनाथाच्या प्रेमाचा समान धागा आहे. असेच धागे भारत -पाक मध्ये ( उदा. भगतसिंग) निर्माण करणे.
२०.भारतात मुस्लिमसत्ता जवळजवळ ७०० वर्ष राहिलेली होती. अनेकवेळी राजा मुस्लिम आणि प्रधान हिंदू असा प्रकार असे. अशा एकतेचे साहित्य प्रकाशित करणे. अनेक राजांनी इतरधर्माचा सन्मान केला होता, त्यांना जमिनी,दानपत्रे दिली होती. त्याच्याबद्दलची माहिती पुन्हा प्रकाशित करणे.
वरील यादी कमी अथवा जास्त करता येईल. मुख्य म्हणजे हे सोपे आहे, सहज आहे आणि आवश्यक आहे. द्वेष आणि तिरस्काराची भावना भारत आणि पाकिस्तानाला घातकच ठरेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी किती वेळ लागेल? माननीय क्लिंटन ( मिपा अग्रलेखाचे लेखक आणि प्रखर देशभक्त) हे जर सैन्यकारवाईसाठी २००० वर्ष थांबायला तयार असतील तर चर्चा आणि आदानप्रदानाच्या कार्यक्रमासाठी आपण २५ वर्ष द्यायला काहीच हरकत नाही.
पुढील समारोपीय लेखात भारताचे विभाजन हे कसे अनैसर्गिक होते आणि त्याचे एकत्र येणे कदाचित अवघड असेल तरी आपण चांगले शेजारी कसे बनू शकतो यावर असावा असा माझा कटा़क्ष असेल.
द्वारकानाथ
याद्या
20625
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता टाळका सटकला
+१
In reply to आता टाळका सटकला by टारझन
अरे बाप्पा रे!!
गांधीवादा
असेच म्हणतो
In reply to गांधीवादा by विसोबा खेचर
मी पण
In reply to गांधीवादा by विसोबा खेचर
सहमत!
In reply to गांधीवादा by विसोबा खेचर
सोपे उत्तर....
पुढची जंत्री
+१०००
In reply to पुढची जंत्री by केदार
शल्य डाचत राहिल.
In reply to +१००० by इनोबा म्हणे
कलंत्री सर...
लढके लिया
अत्र्यांचा अहिंसाविरोधी (गांधीविरोधी) लेखातली काही वाक्य
+१
In reply to अत्र्यांचा अहिंसाविरोधी (गांधीविरोधी) लेखातली काही वाक्य by एक
टाळ्या...
In reply to अत्र्यांचा अहिंसाविरोधी (गांधीविरोधी) लेखातली काही वाक्य by एक
+१
In reply to अत्र्यांचा अहिंसाविरोधी (गांधीविरोधी) लेखातली काही वाक्य by एक
>>
In reply to अत्र्यांचा अहिंसाविरोधी (गांधीविरोधी) लेखातली काही वाक्य by एक
सहमत आहे
In reply to अत्र्यांचा अहिंसाविरोधी (गांधीविरोधी) लेखातली काही वाक्य by एक
या लेखमालेचे नाव
कलंत्रीसाहेब,
..
In reply to कलंत्रीसाहेब, by चतुरंग
लहानपणची गोष्ट
लेख नाहीच पटत ...
आत्ता
एक चुक
महेश भट,
हा लेख
दाद
असेच म्हणतो
In reply to दाद by कोलबेर
संबंध काय?
In reply to असेच म्हणतो by आजानुकर्ण
कार्य
In reply to संबंध काय? by एकलव्य
शांत चित्ताने पण पटत नाही हो
In reply to दाद by कोलबेर
सहकार्य आणि भोंगळपणा
मिश्र प्रतिसाद.
कलंत्री सर..
In reply to मिश्र प्रतिसाद. by कलंत्री
चुकीचा टाएम
असहमत आहे
माझ्या
झरदारी आणि गांधीवाद
वापरा बरं तुमचा गांधीवाद!
>>>>गांधीवाद
In reply to वापरा बरं तुमचा गांधीवाद! by अनंत छंदी
उपयोग होईल
In reply to >>>>गांधीवाद by रम्या
माझे मत.
In reply to उपयोग होईल by विकास
धागा
आपण म्हणता
कलंत्री साहेब
कृतीही हवीना.
In reply to कलंत्री साहेब by विनायक प्रभू
अजून काही उपाय
नो होप्स.
निखळ आशावाद.
In reply to नो होप्स. by अभिज्ञ
>>गांधीवादा
माझा अन्वनार्थ.
In reply to >>गांधीवादा by पक्या
'फुलही रुतावे असा दैवयोग'
'फुलही
In reply to 'फुलही रुतावे असा दैवयोग' by प्रभाकर पेठकर
प्रतिसाद
In reply to 'फुलही रुतावे असा दैवयोग' by प्रभाकर पेठकर
खरं सांगू का?
गांधीवादा