नमस्कार मंडळी....:)
स्वाती ताई सारख्या सुगरणीकडुन प्रेरणा घेऊन आज एक पाककृती देण्याचा हा छोटासा प्रयत्न :)
हैद्राबादी व्हे़ज बिर्याणी
साहित्य -
१ १/२ कप बासमती तांदुळ ३० मिनिट भिजवुन ठेवावेत
२०० ग्रॅम बटाटे सालं काढुन चिरलेले
२०० ग्रॅम गाजरं सालं काढुन चिरलेली
५० ग्रॅम काजु
५० ग्रॅम बदाम भिजवुन सालं काढलेले
२५ ग्रॅम बेदाणे
१०० ग्रॅम कांदा बारीक चिरलेला
४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ टी. स्पून आलं पेस्ट
१ टी. स्पून लसूण पेस्ट
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून ति़खट
१ कप दही
१ टी स्पून केशर
२ टी स्पून दुध
१/३ कप पुदिन्याची पानं बारीक चिरुन
१/३ कप कोथिंबीर बारीक चिरुन
६ हिरवे वेलदोडे
६ लवंग
१ दालचिनी
३ तमाल पत्र
१२० ग्रॅम तुप
मिठ चविनुसार
गुलाब पाणी गरजेनुसार
भिजवलेली कणिक बिर्याणीचं भांडं सील करायला
कृती -
१. भिजवुन ठेवलेले तांदुळ एका भांड्यात घेऊन त्यात ३ कप पाणी टाका. त्यात ३ वेलदोडे, ३ लवंगा,दालचिनीचे २ तुकडे, आणि १ तमालपत्र टाका आणि भात पुर्ण शिजवुन घ्या. जास्तीचं पाणी काढुन टाका आणि झालेला भात बाजुला ठेवा.
२.दही व्यवस्थीत फेटुन घ्या आणि त्याचे २ भाग बनवा.
३.केशर पाण्यात भिजवुन घ्या आणि दह्याच्या एका भागात घाला.
४.एका पॅन मध्ये तुप गरम करुन त्यात उरलेला खडा मसाला घाला आणि मध्यम आचेवर तडतडेपर्यंत परता.
५.बारीक चिरलेला कांदा घालुन तो सोनेरी रंग येईपर्यंत परता. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं - लसुण पेस्ट घाला आणि १ मिनिट परतुन घ्या. त्यात हळद, तिखट आणि सर्व भाज्या घालुन व्यवस्थीत परतुन घ्या.
६. यात दह्याच्या दुसरा भाग व २/३ कप पाणी घालुन उकळी येईपर्यंत ठेवा. भाज्या पुर्ण पणे शिजवुन घ्या.
७. भाज्या शिजल्या की त्यात काजु, बदाम,बेदाणे घाला.
८. यात केशर घातलेल्या दह्याचा थोडा भाग, पुदिना आणि कोथिंबीर घाला.
९.मग त्यावर निम्मा भात घाला आणि पुन्हा त्यावर दह्याचं मिश्रण, पुदिना आणि कोथिंबीर घाला. यावर पुन्हा एकदा उरलेल्या भाताचा थर द्या व भांडं घट्टं झाकण लावुन बंद करा. वाफ जाऊ नये म्हणुन झाकण कणिक लावुन सील करुन घ्या.
१०. हे भांडं प्री-हिटेड ओवन मध्ये १५-२० मिनिटं ठेवा आणि गरम गरम सर्व करा.
याद्या
15578
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
निषेध
राज अरे
In reply to निषेध by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
मग ठीक आहे..
In reply to राज अरे by मिंटी
कधिही....
In reply to मग ठीक आहे.. by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
मी नेहमी
In reply to कधिही.... by मिंटी
हैद्राबाद
नावाला जागा!!
In reply to हैद्राबाद by घाटावरचे भट
>>भटा, जरा
In reply to नावाला जागा!! by सुनील
भट
In reply to >>भटा, जरा by घाटावरचे भट
(विषय दिलेला नाही)
In reply to भट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मस्तच
माते मस्त
छानच गं!
धन्यवाद
In reply to छानच गं! by मनस्वी
हैद्राबादी बिर्याणी आणि व्हेज?
छान..
मस्त गं मिंटी!
एक शंका!!
हा फरक
In reply to एक शंका!! by पिवळा डांबिस
:)
In reply to हा फरक by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
व्हेज नाही
In reply to :) by पिवळा डांबिस
क्या बात है!!!!
In reply to व्हेज नाही by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
प्रकटाआ, डुप्लिकेट!
In reply to व्हेज नाही by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
प्रकटाआ, ट्रिप्लीकेट!!!
In reply to व्हेज नाही by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
पाकॄ आणि