नमस्कार मंडळी,
गुन्हा आणि शिक्षा यावर गेले काही दिवस माझ्या मनात विचार येत आहेत. मिपाकर या विषयी त्यांची मते मांडतील तर मला मदत होईल.
श्री. बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका अनुभवकथना नंतरच्या प्रतिसादांत 'ऑनर किलिंग' बद्दल प्रतिसाद आले. एखाद्या स्त्री अथवा पुरुषाला समाज दोषी ठरवून अतिशय कठोर अशी शिक्षा देतो. त्या शिक्षांचे प्रकार वाचून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते प्रकार अमानुष, असंस्कृत आहेत असे म्हटले. खरोकरच माणसाला मारण्याचे ते प्रकार वाचून मन सुन्न होऊन जाते. या प्रकारात स्थानिक समाज त्यांच्या समजुतीप्रमाणे धर्मबाह्य समाजबाह्य वर्तन केल्याबद्दल अश्या तर्हेच्या क्रूर शिक्षेस एखाद्या व्यक्तीला पात्र ठरवतो. तसेच त्यांच्या दुसर्या एका अनुभवकथनात आखाती देशातल्या शिक्षांबाबत चर्चा होती.
श्री. विनायक प्रभू यांनी केलेल्या एका अनुभव कथनात ते एका लैंगिक शोषण झालेल्या लहान मुलीची कथा सांगतात. त्यांचा अनुभव वाचून आपण खरेच खिन्न होतो आणि दोषी व्यक्तीवर संतापून जातो. त्या लेखाला आलेल्या प्रतिक्रियांत अनेकजण दोषी व्यक्तिची 'चपलेने पूजा' इथपासून 'ठेचून मारले पाहिजे' अश्या तर्हेने आपला संताप व्यक्त करतात.
या तीन लेखांना आलेले प्रतिसाद पाहता मी विचारात पडलो. अतिशय सभ्य, सुशिक्षित आणि नागर संस्कार झालेल्या लोकांना दोषी व्यक्तीचा आलेला राग समजू शकतो. पण त्यातून सुचवलेले शिक्षेचे उपाय मात्र मला विचारात पाडतात.
यावरुन मी विचार करु लागलो की गुन्हा नक्की कशाला म्हणावे आणि शिक्षा नेमकी कशी असावी ?
स्वतःच्या आनंदासाठी अथवा फायद्यासाठी दुसर्याला (एक किंवा अनेकंना) पीडा देणे, नुकसान करणे याला गुन्हा म्हणावे. ही व्याख्या ठीक आहे का?
आपण कशी व्याख्या कराल? साध्या समजेल अश्या (म्हणजे कायदेशीर नसलेल्या:)) शब्दांत मला याबाबतचे विचार जाणुन घ्यावेसे वाटतात.
आता गुन्हेगार कोण हे ठरल्यावर शिक्षा देणे आले.
जसजसे नागर संस्कार वाढत जातात तस तसे 'अमानुष' वागणे म्हणजे काय? गुन्हा कशा स म्हणावे? याबद्दलची कल्पना घडत-विकसीत होत जाते. आणि शिक्षा सौम्य होत जातात असे मला वाटते. काही वेळा मनोविकृतीमुळे गुन्हा घडला असे म्हणून अनेक गुन्ह्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असतो.
जो गुन्हा करतो तो प्रत्येक मनुष्य मनाने कमकुवत झाल्याने अथवा तणावाखाली आल्याने त्याच्या कडुन गुन्हा झाला असे सुद्धा कोणी म्हणू शकते.
मग शिक्षा कशी असावी? त्याचे काही निकष असवेत. म्हणजे गुन्ह्याची तिव्रता आणि व्यापकता यावर शिक्षा अवलंबून असावी असे माझे मत. पण हे निकष सापेक्ष असल्याने न्याय देणे हे खरेच अवघड काम आहे.
आपली मते जाणुन घ्यायला उत्सुक आहे. गुन्हा कशाला म्हणावे आणि शिक्षा कशी असावी यावर मूलभूत विचार आपण मांडावेत अशी विनंती.
-- लिखाळ.
वाचने
13338
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुन्हा आणि शिक्षा
बरोबर आहे..
In reply to गुन्हा आणि शिक्षा by रामपुरी
>>तरी
In reply to बरोबर आहे.. by लिखाळ
सहमत
In reply to >>तरी by घाटावरचे भट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहमत
In reply to सहमत by नंदन
सार्वकालिक
In reply to सहमत by नंदन
बलात्कार हा सार्वकालिक गुन्हा आहे!
In reply to सार्वकालिक by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हे उत्तर
In reply to बलात्कार हा सार्वकालिक गुन्हा आहे! by चतुरंग
शिक्षा कशी असावी
ज्यूरी वगैरे
In reply to शिक्षा कशी असावी by भास्कर केन्डे
+१
In reply to ज्यूरी वगैरे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
३५० वर्षे थांबा....
In reply to +१ by मुक्तसुनीत
सहमत
In reply to ज्यूरी वगैरे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो
In reply to सहमत by नंदन
अगदी..
In reply to सहमत by नंदन
सहमत आहे
In reply to ज्यूरी वगैरे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
भास्करराव,
In reply to शिक्षा कशी असावी by भास्कर केन्डे
न्यायाची सापेक्षता
आपला
In reply to न्यायाची सापेक्षता by भाषांतरकार
प्रष्न
आशा
लिखाळ, या
पटण्यासारखे / एक बारीक कीस
In reply to लिखाळ, या by बिपिन कार्यकर्ते
हयुमन राईट्स ऑर्ग्स आणि वृत्तपत्रे
In reply to पटण्यासारखे / एक बारीक कीस by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
सहमत...
In reply to पटण्यासारखे / एक बारीक कीस by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
जी कृत्यं
In reply to सहमत... by बिपिन कार्यकर्ते
या वरुन
न्याय आणि न्यायदान
माझेही
लै भारी
..
माझेही मत.
आपला
In reply to माझेही मत. by रामशास्त्री
मृत्युंजयाची प्रस्तावना वाचावी.
>> दुसरा
In reply to मृत्युंजयाची प्रस्तावना वाचावी. by कलंत्री
साखळी समजुन घेतली पाहिजे.
In reply to >> दुसरा by लिखाळ
काय मस्त
सुशिक्षित आणि नागर संस्कार झालेल्यांनी सुचवलेले शिक्षेचे उपाय