सलाम त्या शुराना .....शहिद झालेल्या विराना
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
{मुंबईत झालेल्या कालच्या बोम्ब स्फोटात अतेरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या त्या सा-या लोंकाना अन पोलिस कर्मचा-याना ही आदरांजलि ...
)
रोजच्या सारखे आई बाबा गेले कामाला
पुन्हा येतील घरी परत वाटे आम्हाला ..
रात्र झाली कुणाची आई आली बाबा आले
पण माझे बाबा रात्री उशिरा येतील हेच वाटले
रात्र झाली इतक्यात कुठून तरी आवाज आले
बाबा धावत तिकडे गेले ...
काही लोक ज्यांच्या हातात मोठी बन्दूक लोकांवर गोल्या झाडी
शुर माझे बाबा अन त्यांचे मित्र हाती लहान क्षस्रे तरी त्यांचा पीछा न सोडी..
ह्या आधी बाबा माझे असेच शुरा सारखे लढले होते
न जानो कितिक अपराधी त्यांच्या पायाशी येउन निपचित पडले होते
पण काळ राक्षस अन भिमासारखे युद्ध घडले होते ..
लोक सांग तात बाबा अभिमन्यु सारखे लढले होते
तिकडे हात बोम्ब एके ४६ अन बाबांकडे तेच जून पुराने पिसतोल होते ,
नाहीतर आजही बाबा सुखरूप घरी असते ..
ते नाही आले आल्या त्या त्यांच्या शहीद झाल्याच्या बातम्या
आईच्या काळजाला यातना
आता ती बोलत नाही बघत असते दाराकड़..
आई बाबा कुठे ग गेले विचारता बोट करते नभाकड़..
आज शा ले लाही होती सुट्टी
बाबानी माझ्याशी केलि का अशी कट्टी?
सगळे घेतात जवळ मला फिरवतात हात तोंडा वरुण
मला कलेना का गेले बाबा सोडून अर्ध्यावरून..
ताई च्या लग्नाची बाबाना होती चिंता
मी आहे असा लहान कोण सोदवेल हां गुंता?
आज सकाळी सा-या पेपरात फ़क्त बाबांचे गुणगान होत
तुम्ही काही ही बोलणार बोलायला तुमच काय जात ?
आजी आजोबा बनले जसे दगडांची मूर्ति !
बाबा इतके शुर की देवबप्पाला कळाली कीर्ति?
काल बाबांकडे मी खाऊ मागितला होता
नाही दिला म्हणुन कोपा-यात रुसून बसलो
याना बाबा नको आता खाऊ
सांगा मी रोज सकाळी अन रात्रि कुणाला पापी देऊ ?
आई च्या डोळ्यातल रडून रडून संपलय आता पाणी...
उठालाय कर्फु लोक जाऊ लागले पुन्हा कामाला
आतातरी येतालना बाबा घरी तुम्ही झोपल्यावर
दिवसा मी लावणार नाही जोरात गाणी
बाबा नका असे रुसू नाका लपून बसु
आजी बाबा अन आईच्या गालावरच रुसले हसू
...............
बाबा सांगा कुठवर मी तुमची वाट पाहत बसु ?
kavi grishm gunjal
वाचने
1879
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
मृत्युच्या जबड्यात
सलाम त्या शूर वीराना...
मित्रा