मुंबईवरच्या नीच हल्ल्याच्या बातम्या आम्ही सीएनएन वरुन बघत होतो. अशा दु:खद वेळेला आणखी एक क्लेशदायक बाब पहायला मिळत होती. या वाहिनीवर (तसेच त्यांच्या संकेत स्थळावर) भारताच्या नकाशात कश्मिर दाखवतच नव्हते! जागतीक प्रसार मध्यमांनी युनो ने संमत केलेले नकाशे दाखवावेत असा संकेत आहे. युनो ने संमत केलेल्या नकाशात पाकव्याप्त व चीनने गिळंकृत केलेले भाग वगळून काश्मिर भारताच्या नकाशातच दाखवला जातो.
अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध!
या सारख्या प्रसार माध्यमांचा निषेध करण्यासाठी आपण त्यांच्यावर निषेधपत्रकांचा भडिमार करावा असे वाटते. आम्ही काही मित्र मिळून असे इमेल त्यांना पाठवत आहोत. तसेच त्यांच्या संकेतस्थळांवर याविषयी निषेध नोंदवत आहोत. अजून काय करावे बरे?
वाचने
3045
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कायदेशीर कारवाई?
आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदेशीर कारवाई
In reply to कायदेशीर कारवाई? by सर्वसाक्षी
आपणच षंढ आहोत
पाकव्याप्त काश्मिर बद्दल नव्हे
In reply to आपणच षंढ आहोत by वेताळ
अशा संकंट
अहो...
अरेरे! निषेध! निषेध! निषेध!