एक बातमी नेहमीच्या सदरातील.
भ्याड हल्ल्यांना न घाबरता मुंबईकर पुन्हा सावरले
मुंबई - बुधवारी रात्री दक्षिण मुंबईच्या विविध भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मनात भीतीची सावलीही उमटू न देता सामान्य मुंबईकराने गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन कामाला सुरवात केली आहे. शहरातील सामान्य जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.
"ताज' आणि "ओबेरॉय' हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराची कारवाई अजून सुरू असली, तरी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र आहे.
बुधवारच्या हल्ल्यानंतर बंद पडलेली लोकल सेवा गुरुवार सकाळपासून पुन्हा एकदा सुरळीतपणे चालू झाली आहे. "बेस्ट'ची दक्षिण मुंबईतील सेवाही सुरू असून, टॅक्सीही रस्त्यावरून धावू लागल्या आहेत.
याआधीही बॉम्बस्फोटांसारख्या भ्याड हल्ल्यांमुळे घाबरून न जाता मुंबईकरांनी आपली जिगर दाखवत दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवले होते. बुधवारी रात्री झालेल्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर हीच जिगर त्यांना या संकटावर मात करण्यास मदत करेल, हे नक्की.
किती काळ याच स्वरूपाच्या कुचाळ आनी कुटाळ बातम्या देवुन प्रसार माध्यमे मुम्बईकरान्ची चेष्टा करणार आहेत.
मरणाचे भय मुम्बईकराना वाटत नाहीच अश्या स्वरूपाची ही बातमी आहे. परन्तु पोटाची भूक मरणावर मात करते हीच वस्तुस्थीती आहे.
आपणाला काय वाटते ?
वाचने
2377
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत!!!!
असहमत!
हे 'कामावर
In reply to असहमत! by सर्वसाक्षी
मुंबईकरां
In reply to असहमत! by सर्वसाक्षी
आपल्या
कालच