Skip to main content

माझे घर

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/03/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मझ्या घराचा तुम्हा काय सांगू थाट ? रुबाबदार रस्त्यातून एक डौलदार पायवाट! स्वागता असे उभी जाई जुई ची कमान वृंदावनातील तुळशीला असे मोठा मान भवतालीचा बगीचा पशू पक्षांना आसरा कुंपण सभोवती करी काटेरी पहारा दारासमोरील प्राजक्ताचे निर्मळ असे मन विहीरीतील गोड पाणी भागवीते तहान. टांगता कोहाळ दूर ठेवी अरिष्ठ काळी सान बाहुली काढी घराची दृष्ट. ओटीवरला झोपाळा झुलतो झोकात उंबरठ्यावर लक्ष्मी, पावलांच्या रुपात. घरात नाद घुमतो दुडदुडणार्‍या पैजणांचा माझ्या बाळाच्या बोबड्या ओठांचाही चाळा. थोरा-लहानांची माया जसे माठातले पाणी एकत्र कुटुंबाचे, घर कौतूके गातो गाणी.
Taxonomy upgrade extras

गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 17/03/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
गिरणीचा तो गप्प धुरांडा ओकीत नाही आता धूर परि भोंग्याची उगा भैरवी ऐकुनी येतो भरुनी ऊर...!!! आताच चंद्रकांत गोखले यांची काहि मुक्तके वाचली त्यावरुन हा सारा लेखन प्रपंच करत आहे मिपाकर ह्याविषयी सांगोपांग चर्चा करतील अशी आशा आहे उध्वस्त गिरणगावांचे प्रातिनिधिक स्वरुप एका बाजुला बंद गिरणीची चिमणी तर एका बाजुला धनदाडंग्यांचे टोलेजंग टॉवर आता गिरण गावाचे टॉवर गाव नाव होणार १९८० सालि बोनसची टक्केवारी वाढवून मिळावी म्हणून गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला.

मैफल

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 16/03/2009 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजमधली अत्यंत हुशार, उत्साही, लाघवी आणि नंतर "श्रीमंत पतीची राणी "झालेली एक मैत्रिण अचानक एका लग्नात भेटली. त्यावेळी तिच्या भाग्याचा हेवा करणार्‍या सगळ्याच मैत्रिणींची तिच मनोगत ऐकल्यावर जी अवस्था झाली, तिच वर्णन करण कठीण होत. तरीही या गझलेत तिच्या भावना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूमिका मांडण्याच कारण इतकच, की सगळीच दु:ख आपली नसतात, पण ती आपली कधी होतील, याचा नेम नाही. त्यात व.पुं. च्या भदेप्रमाणे आम्ही लोकांची मानसिक दुखणी उसनी घेण्यात तत्पर!
Taxonomy upgrade extras

आणखी काही मुक्तके

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 16/03/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती अशाश्वताच्या वळुनी मुठी, शाश्वतावर चढवु हल्ला, असंतोषाचा करुनी भाला, काळावरती घालु घाला..!!
गवंडी घाम घालतो रक्त सडा अन जखमातुन गळतो पू मरणारा परी मरे परंतू जगणा-यांचे त्यावर कंपू...!! भिकारी बन्द गिरणीच्या गेटा वरती भीक मागतो एक भिकारी घेउनी हडांची जीर्ण पंजरी द्या हो म्हणतो मला नोकरी अन गिरणीचा तो काळाठिक्कर असूनी दगड क्षणांत रडला हे श्रमाचे हात
Taxonomy upgrade extras

कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो

लेखक निखिलचं शाईपेन यांनी सोमवार, 16/03/2009 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकगीत हवे आहे : साळसूद (दिलीप प्रभावळकर) मालिकेचे "कोण कुणास्तव जगतो मरतो, कोण कुणास्तव सतत कष्टतो......" ओळी किंवा म्पी३

<शीघ्र कवीची एक कविता>

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 16/03/2009 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते सारेच रस्ते तीच्या घराकडे जाणारे , मोरपीस. एक-दोन-तीन-चार म्हणताच काटा आणणारे, एखादाच रस्ता असतो गुहेत सावज दाखवण्यासाठी निघालेला, ती च्या भावाच्या गँगलाही माझ्यापर्यन्त आणून सोडणारा.

हात

लेखक मी गौरी यांनी सोमवार, 16/03/2009 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
हे अजुन एक असेच.

(शीघ्र कवीच्या तीन वेता!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 16/03/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्यांच्या धाकाने आमच्यातला कवी मेला!" असं म्हणणारे प्राडॉ जेव्हा तब्बल तीन-तीन कवितांचा नजराणा घेऊन आलेले बघितले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि आम्ही लगोलग मुद्याला हात घातला ;) कवितेच्या बागेत कळ्या सजतात कविता कळ्यांना स्वतःच्या केसात खोपा करुन माळतेही. तसा विडंबक आसुसलेला असतो कळ्यांच्या निवासी खोप्याला, होतं काय, ओळींतून सुकलेली फुलं पडतात आणि विडंबक निराश होतो! दोन गावंढळासारखी दळता येत नाही पिठासारखी भसाभस कविता मुकाट्यानं शांत बसावं एका जागी, तर तेही नाही जालावर येतो हायसे वाटण्याचे क्षण मिळावेत म्हणून, तर इथेही कवीच्य