Skip to main content

लिहून काय साधले

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 20/03/2009 15:44 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल  जगून काय साधले

लिहून काय साधले विचारतोस केशवा
(निदान तू तरी असे म्हणू नकोस "केशवा")

जरा कुठे लिहायला तजेलदार लागले
धुण्यापरी तरी  कशास बडवतोस केशवा

अरे मला विचार ना, तिनेच बोंब मारली
पुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवा

अजून वाटते नवल कशी असेल ती बया
स्मरून जीस तू असा थरारतोस केशवा

उन्हाळा

लेखक जागु यांनी शुक्रवार, 20/03/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात प्रत्येकाच्या तोंडावर रोज एकदातरी ही वाक्य येतातच. "केवढ गरम होतय आज" रोज मध्ये हा आज असतो. "काय उन पडलय कडकडीत", "बाहेर नकोस वाटतय उन्हामुळे", "कधी संपेल हा उन्हाळा ?" उन्हाळ्याकडे आपण ह्याच दृष्टीने बघतो. तो नकोसा वाटतो. गर्मि ने जीव हैराण होतो. खरच आहे ते. पण ह्यातले आपण फक्त अवगुणच पाहतो. पण ह्यात पण बरेच गुण आहेत. उन्हाळ्यातच मुलांना आणि आपल्याला मार्च एप्रिल पासून सुट्टीचे वेध लागतात. गावाला जायचे, फिरायला जायचे बेत आखायला सुरूवात होते. मे महीना म्हणजे काय मजेला उधाणच. मामाच्या गावाला ह्याच दिवसांत जायला मिळते. शाळेला सुट्टी मिळुन झोपेवरचे, खाण्यावरचे बंधन नाहीसे होते.

खाजाच्या करंज्या

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 20/03/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
पेठकरांनी दिलेल्या कातील करंज्या पाहून मला खाजाच्या करंज्यांची आठवण झाली.
साहित्य- आवरणासाठी: १ वाटी रवा, १वाटी मैदा, दूध, ५,६ मोठे चमचे साजूक तूप, २ ,३ चमचे तांदळाची पिठी/कॉर्नफ्लोअर सारणासाठी: १ नारळ,२ वाट्या साखर, वेलचीपूड,२ चमचे बदाम/काजू पावडर,मूठभर बदाम,पिस्ते इ.चे तुकडे,बेदाणे ( ४,५ चमचे गुलकंद वेलचीऐवजी घातला तरी वेगळा,सुंदर स्वाद येतो.) खवा हवा असल्यास अर्धी वाटी खवा घेऊन भाजून घ्यावा आणि अर्धी वाटी साखर जास्त घ्यावी. तळणीसाठी :

नाहीच जमत बुवा काही गोष्टी!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 20/03/2009 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी खरं तर (यावरून काही अंदाज बांधता येतोय का?) विद्युत अभियांत्रिकीमध्ये एका बर्‍यापैकी नावाजलेल्या शासकीय महाविद्यालयातून (पुण्याचे नव्हे!) पदवी प्राप्त केलेला अभियंता आहे. पदवी मिळवून आता नऊ वर्षे होत आलीत. त्यानंतर त्याकाळच्या शिरस्त्याप्रमाणे इकडे-तिकडे फुटकळ उमेदवारी करून मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एका अत्यंत निरुपद्रवी आणि जिथे तांत्रिक गोष्टींचा अगदी कमी संबंध येतो अशा परंतु डोक्याचा भुगा करणार्‍या कार्यक्षेत्रात घुसलो. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम सुरू करून मला पाच वर्षे झालीत. तसं माझं संगणकाच्या किंवा संगणकप्रणाली विकसित करण्याच्या तांत्रिक अंगांचं ज्ञान अगदीच नगण्य आहे.

बदल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 20/03/2009 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज त्याच दिशा रोज रोज त्याच वाटा दिशांनी पण वाटा थोड्या बदलायला हव्यात. रोज रोज तेच गाव रोज रोज तिच पायवाट वाटेनेही गाव जरा विसरायला हवे. रोज रोज त्याच व्यथा रोज रोज त्याच कथा कथांनीही कधी कधी व्यथांना सावरायला हव. रोज रोज तिच छाया रोज रोज तोच दाह दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव. रोज रोज तेच हसण रोज रोज तेच रडण रडता रडता खुदकन जरा हसायला हव. रोज रोज तिच सकाळ रोज रोज तिच संध्याकाळ संध्याकाळ्नेही थोड सकाळसारख ताज व्हाव. रोज रोज तिच घडण रोज रोज तेच जीवन जीवनातही कधी कधी बदल घडवायला हवा.
Taxonomy upgrade extras

सय

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/03/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
जोडली नाती कशी मी आठवणे आज नाही ! तोडले कां पाश सारे साठले ते घाव काही ! सोडला तो गाव तुझा आसवांचा ठाव नाही ! आठवांची राख झाली दाटलेले भाव काही ! चांदण्यांची याद ओली शापितांचा चंद्र नाही ! मानसी आकांत चाले तुंबलेले बांध काही ! विशाल

प्रणय सोहळा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/03/2009 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
रुप पहाता राधेचें, शाम गाली हासला यमुने काठी, शाम राधेचा, प्रणय सोहळा रंगला यमुने काठी शामसावळा, मोर मुकुट पितांबर ल्याला शामल सुंदर, रुप मनोहर मोर मुकुट पितांबर सुंदर शामरंगी काजळ होऊनी राधा नयनी जाऊन बसला. यमुने काठी, शाम राधेचा, प्रणय सोहळा रंगला गौर गुलाबी राधा काया, राधा ना ति जग्न माया, चित्त चोराची,एकुन बासरी मनी उठल्या त्या प्रेमलहरी मन मयुर तो नाचु लागला यमुने काठी, शाम राधेचा, प्रणय सोहळा रंगला अलौकिक सोहळा यमुने काठी खेळे राधा अन जगजेठी नाचे नंद नंदन,नाचे मन मोहन नाचे राधा नाचे यदु नंदन पाहि अवतारी जन, पाहि सिध्द भक्तजन पाहि ब्रज गोधन,पाहि हरपुन तन मन तो शाम राधेच्या,मनी जावुनी ब

दोन सूचना

लेखक शक्तिमान यांनी गुरुवार, 19/03/2009 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा सं.स्थळाबाबत मला दोन प्रेमळ सूचना करायच्या आहेत.... १. मिपावरील लेखसूची मधील लेखांचा क्रम हा प्रतिक्रियेप्रमाणे ठरतो. ज्या लेखावर काहीच वेळापूर्वी प्रतिक्रिया आली आहे.. तो लेख सर्वात वर येतो. ही व्यवस्था चांगली आहे. यात अधिक भर म्हणून 'सॉर्ट लेख बाय नंबर ऑफ रीप्लायज्' (प्रतिसाद-संख्याअनुक्रमे लेखक्रम लावणे) असा पर्याय पुरवता येईल का? म्हणजे ज्या लेखावर (साहित्यप्रकारावर) सर्वात जास्त प्रतिक्रिया असतील तो सर्वात वर येईल. यामुळे जुने उत्तम लिखाण शोधणे सोपे जाईल.... २. बर्‍याचदा असे आढळते की लेखाची वाचने ५०० च्या वर जातात पण लेखावर प्रतिसाद ५-६च असतात.

सांज-राधा

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 19/03/2009 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्या सांजकोवळ्या उन्हात सजल्या वाटा गुणगुणती गीते तुझी निरागस लाटा मावळतीवरती रंग नवे क्षितिजाचे पाऊल वाजते हलके बकुळफुलांचे माडांच्या छाया झुलती वार्‍यासंगे जणु कृष्णसख्याचा रास आगळा रंगे आसमंत भारित सूर मुरलीचे आले कालिंदीचे जल थबके, कदम्ब डोले तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखांचा दरवळतो हलका भास मधुर गंधाचा या चराचराला जडली त्याची बाधा श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा
Taxonomy upgrade extras