Skip to main content

रगडा पॅटिस (फोटु सहीत)

लेखक समिधा यांनी सोमवार, 23/03/2009 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
हा पदार्थ ह्या आधी मि.पा.वर दिला आहे,पण माझी पध्द्त थोडी वेगळी असल्याने मी पण देत आहे. पॅटिसः साहित्यः बटाटे ३-४ हळद,तिखट्,मिठ, चविनुसार ब्रेड स्लाईज २ तेल पॅटिस भाजण्यासाठी कृती: बटाटे उकडुन मॅश करुन घ्यावेत. त्यात हळद,तिखट्,मिठ आणि पाण्यात भिजवुन काढलेले ब्रेड स्लाईज घालुन मस्त एकजिव करावे हव्या त्या आकाराचे पॅटिस बनवुन तेलावर भाजुन घ्यावेत.

क्षण.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी रविवार, 22/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण ! कणकण जळे अन, क्षणक्षण झुरे.. झाला जीव सखे वेडा.. तुझ्या पायी ग.. भरुभरु डोळे बघ, वणवण फ़िरे.. आता इथे-तिथे-कुठे.. ठाई ठाई ग.... तुझ्याविना जग सारे, उदास भकास, गेला हरवुन सूर.. अन हरपले गाणे.. जगताना आणि सांग,किती वेळा करायचे,रोजरोज तेचतेच,खोटे ग बहाणे एका तुझ्या भेटीपायी,वेड्या वेड्या आशेपायी,उरे श्वास उरे जीव,काही ग.. कण कण जळे अन....... [१] तुझी मीठी गंध-धुंद,उश्ण श्वास धपापला,क्रिश्णमेघी केसांची ग छाया... हरवलो हरपलो,आणि विसरुन गेलो,सखे दोन जीव,एक काया.. माझ्या देही तुझा गंध,तुझा माझा एक श्वास,दोन कुडी एक प्राण,ठाई ग.. कण कण जळे अन........

दुसरा कुणीच नाही....

लेखक जयवी यांनी रविवार, 22/03/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही माणूस माणसाचा झाला कधीच नाही गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही शमले तसेच सारे देहातले निखारे वणव्यास पावसाची नड भासलीच नाही काळोख तुंबलेला दाही दिशात सारा सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले पाऊस का सखा मग झाला कधीच नाही सरणावरी कळाले उपभोग फार झाला उपयोग जीवनाचा केला कधीच नाही जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

अर्थ अवर

लेखक सहज यांनी रविवार, 22/03/2009 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला. सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता यात सामील झाली. सामान्य जनतेबरोबर अनेक उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठे देखील यात सहभागी झाले होते. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. याला मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहून २००८ मधे जगभर हा प्रयोग राबवला गेला. मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक तास दिवे बंद.

मुक्ती

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 22/03/2009 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
रोमरोमात जागली तुझ्या मुरलीची साद दाही दिशा ओलांडून घुमे आज अंतर्नाद भल्या पहाटे प्राणांत जणु काकडा पेटला तिन्ही जगांचा नियंता अंतरंगात भेटला आसावल्या पावलांना वाट दिसे पंढरीची सावळ्याच्या भेटीसाठी नेते ओढ अंतरीची द्रौपदीच्या दारी उभा चराचराचा हा स्वामी भुकेल्याची तृप्ती इथे जाणवते अंतर्यामी दूर भौतिकापासून भक्तिमार्गाला निघाले अंतर्बाह्य बदलले, मन विश्वरूप झाले लक्ष चौर्‍यांशीचे फेरे किती काळ आता साहू? मुक्ती देई मायबापा, आता अंत नको पाहू
Taxonomy upgrade extras

काही रेखाटने...

लेखक पल्लवी यांनी शनिवार, 21/03/2009 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
Hee paahataach baalaa Aai Left Hand Of Hitler : Priller J ***सगळी चित्रं कुठून वा कुठून कॉपी केलेली आहेत...सध्या फक्त बघुन काढायचा प्रयत्न..***

मी एक व्यसनी..

लेखक योगी९०० यांनी शनिवार, 21/03/2009 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
सहज मनात आले. मि.पा. शी गट्टी होण्याआधीचा माझा दिनक्रम कसा होता आणि मि.पा. नंतरचा कसा आहे ह्यावर लिहायचे ..( हं म्हणजे शादीसे पहले आणि शादी के बाद या चालीवर ) आधी एका इतर मराठी संकेतस्थळावरचे लेख वाचायचो. तसे ३/४ दिवसातून एकदा ते स्थळ उघडायचो आणि जे जे काही नवे लेख आहेत ते वाचायचो, प्रतिक्रिया द्यायचो. कधीही स्वतः एक म्हणून लेख लिहीला नाही. लोकं प्रतिक्रिया देणार नाहीत असे वाटले. तसेच मराठी टंकायचा कंटाळा आणि शुद्ध लिहायची (एकही इंग्रजी शब्द नको) धास्ती. त्यामुळे त्या स्थळाशी जेमतेम ओळख झाली. पुर्वी माझा दिनक्रम असा असायचा... (मि.पा.