मिपा सं.स्थळाबाबत मला दोन प्रेमळ सूचना करायच्या आहेत....
१. मिपावरील लेखसूची मधील लेखांचा क्रम हा प्रतिक्रियेप्रमाणे ठरतो. ज्या लेखावर काहीच वेळापूर्वी प्रतिक्रिया आली आहे.. तो लेख सर्वात वर येतो. ही व्यवस्था चांगली आहे.
यात अधिक भर म्हणून 'सॉर्ट लेख बाय नंबर ऑफ रीप्लायज्' (प्रतिसाद-संख्याअनुक्रमे लेखक्रम लावणे) असा पर्याय पुरवता येईल का?
म्हणजे ज्या लेखावर (साहित्यप्रकारावर) सर्वात जास्त प्रतिक्रिया असतील तो सर्वात वर येईल. यामुळे जुने उत्तम लिखाण शोधणे सोपे जाईल....
२. बर्याचदा असे आढळते की लेखाची वाचने ५०० च्या वर जातात पण लेखावर प्रतिसाद ५-६च असतात. यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रतिक्रिया लिहिण्याचा कंटाळा... (पुरावा: कुठ्ल्याही कौलाला १०-१५ मतं नक्कीच मिळतात.. कारण एका क्लिकमध्ये मत नोंदवता येते.. पण प्रतिक्रियेचे तसे नाही.) यावर उपाय म्हणून प्रत्येक लेखावर (कवितेवर..इ.) 'लेख आवडला ' अशा स्वरूपाचे बटण्/लिंक पुरवता येईल का? एखाद्याला लेख आवडला तर तो त्यावर क्लिक करून तसे दर्शवू शकतो. एका सदस्याला एकदाच क्लिक करता येईल.
म्हणजे मग आपण जशी वाचन संख्या दाखवतो तसेच लेख आवडणार्यांची संख्याही दाखवता येईल. याची पुढची पायरी म्हणजे १ ते ५ अशी रेटींगची व्यवस्थाही करता येईल (जसे यूट्युब व्हिडीयोज् ला असते. ). आणि मग यावरही सॉर्टींग चा पर्याय दिला तर उत्तमोत्तम लेखन झट्क्यात सापडवता येईल.. तसेच प्रतिक्रिया न आल्याने लेखक नाराज होणार नाहीत..
मला वाटते की यामुळे मिपा सं.स्थळ वाचकांसाठी अजून सहज-सोपे होईल.
यावर या सं.स्थळचालकांचे/तज्ञांचे/मिपाप्रेमींचे काय विचार आहेत?
वाचने
5139
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन्ही सूचना पटल्या
चोखोबाशी
>>एका ओळीचे
In reply to चोखोबाशी by गणा मास्तर
चांगलि सुचना आहे
चांगला प्रस्ताव
अनुमोदन
In reply to चांगला प्रस्ताव by प्रकाश घाटपांडे
चान्गल्या सूचना पण
छान.
सुचना आवडल्या.
स्तुत्य!
आपुलकीने