Skip to main content

थंडगार फालुदा

लेखक दिपाली पाटिल यांनी बुधवार, 22/04/2009 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे ही ssssssssssss गरमी वाढलीये म्हणून म्हटलं जरा थंड गार फालुदा बनवावा.. वाढणी: ४ साहित्यः १ कप फालुदा शेव १ मोठा चमचा (tbs)सब्जा -- ५-१० मि. पाण्यात भिजवून ठेवणे. २ मोठे चमचे रोज (Rose) सिरप २ कप थंड दुध आइस्क्रिम (कुठले हि चालेल पण वनिला किंवा अमेरिके त एक गुलकंद चे आइस्क्रिम मिळते ते बेस्ट आहे.) नहितर लाइट व्हिप्ड क्रिम पण छान लागते. कृति: थोड्या पाण्यात फालुदा शेव उकडून घ्यावी. अंदाजे ५-७ मि. लागतात. चाळणी त शेव गाळून घ्यावीत.

सौजन्याची ऐशी तैशी...

लेखक शितल यांनी बुधवार, 22/04/2009 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यो आमचा वाडा... या असं हिकडून... वाईच थांबा पर... न्हायी,म्हनलं आमच्या वाड्यामन्दी यायच्या आधी एक गोस्ट इच्चारायची र्‍हायली... तुमच्या आंगी सौजन्य हाये न्हवं? मंग झालं तर... का सांगतुया की... आमच्या वाड्या मन्दी येकून बिर्‍हाडं म्हन्ताल तर खालच्या आंगाला पाच आन वरच्या अंगाला दोन. तुम्हासनी कंच्या आंगाच्या लोकासनी भ्येटायचं हाय त्ये आदुगर कळालं पाईजे म्हंजी म्या तुम्हासनी बराबर न्येतू की नाय त्ये बघा... तर बघा खालच्या आंगाच्या लोकांची गुन-इशेश सांगते... तर ह्ये हाय यकदम कोपर्‍यात राहानारं दिंडोरे कुटुंब... म्हनावं तर पाच माणसंच घरी नवरा बायको आनी दोन ल्येकी आन येक शेंबडा ल्योक...

Thesis , Viva and Jury...

लेखक ओंकार देशमुख यांनी बुधवार, 22/04/2009 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
http://pune-marathi-blog.blogspot.com/2009/04/thesis-viva-and-jury.html नमस्कार... आज खूप महिन्यांनंतर ब्लॉग कडे लक्ष द्यायला वेळ मिळला. वास्तूविद्या (Architecture) च्या शेवटच्या म्हणजे पाचव्या वर्षाच्या शेवटच्या project मध्ये गुंतलो होतो. टॉपिक घेतला होता Pune City Public Library. case studies , analyasis , report ,sheets , plotting या मधे ३ ,४ महीने कसे निघुन गेले काही कळलच नाही. ६ आणि ७ तारखेला contract management , professional practice ची viva झाली.दरवर्षी प्रमाणे ज्यूरी निवा

आजही श्वासात आहे.. लागतो काही सुगावा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 21/04/2009 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रसन्न शेंबेकर यांची सुरेख रचना पाहतो श्वासात कोठे.. लागतो काही सुगावा आजही श्वासात आहे लागतो काही सुगावा काल तू होतीस प्याली सांगतो आहे पुरावा अंगणापर्यंत आता वारुणीचा वास जातो काल मी बहुतेक गेलो ह्याच वाटेने असावा? ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का? "सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा ती म्हणाली "माग ना रे... तू, मला सोडून काही" (ग्लास तू भरशील तेव्हा चेहरा माझा दिसावा!

झाड

लेखक स्वामि यांनी मंगळवार, 21/04/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी लावलं होतं एक स्थावर मालमत्तेचं झाड त्याला कर्जाचं पाणी टाकून, वाढवत होतो हळूहळू. खूप निघत होता व्याजाचा घाम चालू होतं हप्त्याचं ठिबक सिंचन आणी रिकामी होत होती सेविंगची टाकी वाट बघत होतो अशा एका पावसाची ज्याने ओसंडून वाहील पण होत नाहीत अशा गोष्टी अचानक झाडाला पालवी फुटली तरारुन वाढलं एवढं की मला झोप येइना बंद केलं ठिबक सिंचन बास झाला घाम आता फक्त आराम आणि तेवढ्यात ती आली मंदीची साथ अगदीच अनोळखी रोग झाड कोमेजलं होत्याचं नव्हतं झालं सगळं पाणी वाया गेलं आता पुन्हा हिंमत नाही ते झाड ते पाणी आणि ते ठिबक सिंचन.
Taxonomy upgrade extras

या गर्द नील नयनी... दाटुन मेघ आले...

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 21/04/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
या गर्द नील नयनी... ! काही दिवसांपुर्वी प्राजु ने एक कविता पुर्ण करायला सांगितली होती.. मला त्यावर जे सुचले ते मी लिहीलेय.. या गर्द नील नयनी.. दाटून मेघ आले.. का मोर पापण्यांचे.. मिटवून पंख बसले... क्षण एक का असेना.. आस हिच.. तु दिसावी.. परि प्रिया न आली माझी..ओठांत गीत रुसले.. [१] सखये स्मृतीत तुझिया.. बावरा भ्रमर मी झालो.. भिरभिरलो तुज शोधाया.. विरहात श्वास तुटले.. [२] हा मंद धुंद वारा.. अन गंधीत रातराणी... हा चंद्र हेच तारे... मज छळावयास उरले... [३] व्याकुळल्या मनाला... आता तुझीच आस... ओठी तुझेच नांव.... चित्ती तुलाच स्मरले...
Taxonomy upgrade extras

आलो होतो ! (स्फुटिका)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 21/04/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
परवा कुणीच्या (कुणा मुलीच्या ;) ) खिडकीबाहेर चुरगाळलेल्या कागदावर ही कविता मिळाली.
दुपारी घरी कुणी नसेल नक्की ये ! म्हणालीस. आलो होतो. तू सुद्धा नव्हतीस ! काय हे !
जुन्या विनोदाला फाउंड कवितेचा मुलामा. --लिखाळ.
Taxonomy upgrade extras

छळतो अजूनही का

लेखक जयवी यांनी मंगळवार, 21/04/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस कालचा तो छळतो अजूनही का जाळून काळजाला झरतो अजूनही का ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची उघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

कोंबडी भूंकाया लागली

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 21/04/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
गदीमांची क्षमा मागून 'रंगू बाजारला जाते' च स्वैर विडंबन कोंबडी भुंकाया लागली भूंकू द्या अंडी इकाया नेते इकू द्या कोंबू डुलत डुलत चालते गोऱ्या हातात लेखनी हालते लेखन चोरावी एकदा वाटते, वाटते, वाटते, नको बा जरा थांबून बोल ग कोंबू (माझ्या डोस्क्यातल) तुझ्या डोक्यात कसं ग कोंबू ? माजी कलेजी तुटते, तुटली तर , इकूया कोंबू ओळख आहे मी कोण ? माझ्या हातातला लेखण ! मी मनातल मनात ठेवते, ठेवते, ठेवते, ठेवु द्या तुझा पाठलाग कोंबू करीन अशी मुरडून कान मी धरीन तुझं खानपट थोडं फोडते, फोडते, फोडु द्या केली थट्टा अंगाशी आली लाज कोंबूची माझ्या गेली कोंबू थाटात कवन पाडते, चालते ?
Taxonomy upgrade extras