Skip to main content

मी बोचले म्हणालो

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 07/02/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी बोचले म्हणालो, ती कोणत्या ठिकाणी? मी हे तुला कसे पण सांगू मिठीत राणी ठरवून काल लुटले मॉलात बायकोने आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी! गुंगीत राहतो मी सुस्तीत वागणारा असते सदैव पिउनी स्वारी घरी उताणी! असतो खुशीत तेव्हा घेतो मजेत झुरके जातो हवेत तेव्हा होते बधीर वाणी होणार काय ह्याचे आहे जगास पत्ता (हा ढोसतोय दारू समजून रोज पाणी ) खोड्या अशा कवींच्या का काढतोस "केश्या"? लिहिती कधी तरी हे असली सुरेल गाणी - केशवसुमार (सुवर्णमयींच्या ''मी बोचलो म्हणाले' या गझलेवर आधारित)
लेखनविषय:

वाचने 2153
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ठरवून काल लुटले मॉलात बायकोने आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी! हाहाहाहाहा!!!! अगदी अगदी!! (अविवाहित)बेसनलाडू

वा! वा! मस्त विडंबन. --शाल्मली.

मॉलात लुटलेले बघून जीव कळवळला!! ;) एकदम झक्कास! चतुरंग

होणार काय ह्याचे आहे जगास पत्ता (हा ढोसतोय दारू समजून रोज पाणी ) सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी) केशवसुमार