शेवटची इच्छा
कर्नल सतिश मिश्रा हे लष्कराच्या विमंडळात वैमानिक होते त्यांनी लिहिलेल्या एका (सत्य) कथेचा स्वैर अनुवाद
शेवटची इच्छा
आम्ही आमच्या तळावरून रुटीन ट्रेनिंग सोर्टीला निघालो होतो तेंव्हा मध्येच जेव्हा एलसी( प्रत्यक्ष ताबा रेषेवर) पोस्टकडे एक जखमी झालेल्या सैनिकाला (कॅस इव्हॅक) घेऊन जाण्यासाठी रेडिओ कॉल आला. तेव्हा आम्ही प्रत्यक्ष ताबा रेषेवर असलेला तो तळ गाठला आणि लँडिंग करताना दिसणारे दृश्य असे होते.
सर्वत्र एकच खळबळ उडालेली होती .. चिंता, राग, भावनाकल्लोळ इ दिसत होते. शीख सैनिकांच्या तुकडीने त्यांच्या एका कनिष्ठ सैनिकाला घेरलेले होते.
मिसळपाव