~ गोष्ट अक्षतची ~
तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली 'प्रकृती' सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती "न्यु ओरेलान्स" ला शिफ्ट झाली..
अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा ... आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती.
२१५ - आता पुढे काय?
२१५ - आता पुढे काय?
यावर्षी कॅनडामध्ये ‘कॅनडा डे’ साजरा करायचा कोणाचाही, इथल्या कुठल्याही लोकांचा, विचार नव्हता, इच्छा नव्हती. काय आहे कॅनडा डे? तर हा दरवर्षी १ जुलैला साजरा केला जातो. राणीने १९८२ मध्ये जेव्हा कॅनडा काबीज (?) केला आणि तिची सत्ता स्थापन केली, त्या दिवसाला कॅनडा डे म्हणतात. म्हणजे आपल्या १५ ऑगस्टच्या अगदी उलट. त्यामुळे कॅनडा डे हा नेटिव्ह लोकांसाठी दुःखाचा, तिरस्काराचा असा दिवस झाला. त्यांनी तो कधीही साजरा केला नाही, अर्थातच! २१५ (अजून एका शाळेत ७५१ अन्मार्कड (अचिन्हन्कित) ग्रेव सापडल्या आहेत. याचा अर्थ मेलेल्याना तसेच पुरले आहे.आभाची सायकल फेरी
संध्याकाळच आकाश तांबूस झालं होत.पाखर घराकडे झेपावत असतांना त्यांचे पंख त्या तांबूस आकशात एखाद्या उडणाऱ्या सावलीसारखे भासत होते.इवलाश्या खिडकीतून आभा हे सगळ निरखून पाहत होती.शेवटच गणित सोडवून कधी सायकल घेऊन मस्त चक्कर मारायला जाते इतकी उताविळ ती झाली होती.झाल एकदाच गणित सोडवून स्वत:शीच बोलत आभा पटकन “आई मी येते चक्कर मारून”अस बोलून ती खाली पोहचली सुद्धा.सायकल सुसाट चालवत ती मुख्य रस्त्याला पोहचली.थोड अंतर गेलं कि उजव्या वळणावर वळाली. आता नवीनच ट्रक झाला होता.तशी इथे पूर्वी शेती होती.पण आता मोकळे प्लॉटस पाडून इथे विक्रीसाठी होते.
खडकफूल
- डॉ. सुधीर रा. देवरे
घरात काळा समार (मसाला) करायचा झाला तर लहानपणापासून कानावर पडलेलं एक नाव, खडकफूल. खडकफूल हा मसाल्यातल्या पदार्थातला एक घटक आहे. हा पदार्थ मला खूप आवडतो. तो आवडण्याचं कारण त्याच्या रंगामुळं नाही, गंधामुळं नाही, चवीमुळं नाही की त्याच्या आकारामुळंही नाही...
संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/07/blog-post.html?spref=tw
संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/
२१५
२१५
(कृपया मानसिक त्रास होणाऱ्या लोकांनी हा लेख वाचू नये.) आंतरजालावर जी माहिती दिसते ती सगळी खरीच असते असे नाही आणि सर्व सत्य घटनांची माहिती आंतरजालापर्यंत पोहोचतेच असेही नाही. त्यापैकीच हे एक हत्याकांड आहे जे दशकानुदशके लपवून ठेवण्यात आले, घडत गेले, आणि कोणालाही त्याचा पत्ता नाही. स्थानिक लोकांनाही कळायला खूप वेळ लागला पण जेव्हा कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र आज उघडपणे ही बातमी जगासमोर आली आहे आणि आंतरजालावर उपलब्ध आहे. कॅनडावरचा हा डाग मात्र कधीही धुवून निघणार नाही, असे दिसते. आज कॅनडामध्ये २१५ हा काळा आकडा आहे असे म्हणू शकतो.हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!
कटाक्ष-
लेखक: मुनव्वर शाह
संपादन: शुभदा गोगटे
प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन
प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७)
पृष्ठ संख्या: २००
किंमत: ₹१००
ओळख-
१९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.
शिल्पकार !
दगडाचा जन्म देवा, कधी कुणाला नसावा..
कसे जगणे म्हणावे, चटक्यांच्या जगण्याला..
दर्याखोर्यातून कितीदा, देह घरंगळलेला..
किती युगे उलटती, फक्त वाट पाहण्याला..
कुणी लाथ घातलेली.. कुणी उशाला घेतलं..
कुठे पडतांना तुटलं.. कुठं तुटतांना फुटलं..
इतकाल्या दगडांतून, निवडक उचलतात..
अन् रुक्ष आकारातूंन एखादाच घणतात..
छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही
घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई!
--
दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला?
खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला!
राघव
[२०२१]
काव्यरस
चित्रपट आणि वृत्तपत्रातून भाषेचे धडे
Nicos Weg हा जर्मन भाषा शिकवण्यासाठी निर्माण केलेला चित्रपट बघितला. त्यानिमित्ताने भाषेचे धडे घेण्याबद्दलचा माझा अनुभव मी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
२०१९ साली काही कामानिमित्त जर्मनीत प्रवास करण्याची संधी मिळाली. त्याचे निमित्त साधून आणि तिथे उपयोग होईल म्हणून मी Duolingo या ऍपवरून जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मला लवकरच कंटाळा आला आणि आणखी दुसरे साधन मला सापडले नाही. त्यामुळे जर्मन भाषेचे शिक्षण तसेच राहिले. जर्मन भाषा माहित नसल्याने एक गमतीदार प्रसंगही घडला. आम्ही एका क्रमांकाचे घर रस्त्यावर शोधत होतो.
मिसळपाव