मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विठुराया.....

Jayagandha Bhatkhande · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
विठुराया.... तुझ्या प्रेमामृताच्या वर्षावात नित्य न्हाऊनही, कोरडीच राहिली काया.... मन विषयी गुंतले निरंतर, सोडवेना कधी माया... क्षणामागून क्षण संपले, जीवन जातसे वाया... पश्चात्तापे मन तप्त, लाभो तुझी छाया... आता लागो तुझे ध्यान, पडतसे मी पाया... नको दूर लोटूस मजला, विनविते तुज विठुराया...!! जयगंधा.. ९-११-२०१४.

वाचने 4951 वाचनखूण प्रतिक्रिया 11

बाजीगर Tue, 07/20/2021 - 09:10
एकादशीची पहाट विठ्ठलाकडे पाठ मुख्यमंत्र्यासह आठ फोटोसाठी रांगेत उभे वारकरी अडाणी कुणी शेतकरी भवसागर पारकरी तासंतास विठ्ठला पाऊस पाड कोरोना जाऊस धाड मनात खाऊस वाढ हे साकडे किती वर्षे देवा राहशील मूक, म्हणे बाजीगर जन्मोजन्मी चूक, दर्शनानेच मात्र भागवी-भक्त भूक !!