Skip to main content

हा माझा मिसल पाव वर चा प्रवेश

लेखक अभिशेक अधौ यांनी गुरुवार, 21/05/2009 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
जरा विसावता त्या वळणावर कळले मला तुजे च तू पण.... थिजले अंतर विरले ते क्षण... आठवणींच्या त्या वळणावर... कसे कळले कोणास ठावूक तुला हे माज़े वेडेपण... नकळत घडून गेले सारे आयुष्याच्या एका वळणावर... कसे मी विसरु सांग तुला सोडून गेलीस जशी मला जगणे फक्त त्या भाबड्या आशेवर येशील का परतुनी या वळणावर...? ? अभिशेक

यावा अशात साजण

लेखक जयवी यांनी गुरुवार, 21/05/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
सुटे बेभान हा वारा फुले उरात शहारा यावा अशात साजण देत गुलाबी इशारा हृदयाच्या सागरात लाटा उठाव्या खट्‍याळ प्रीतीशरांनी सख्याच्या व्हावे पुरते घायाळ सारी बंधने तोडून उधळावा कैफ सारा वेड्‍या मनाने मनाचा द्यावा सोडून किनारा निळाईने पसरावे आकाशाच्या कुरणात गाणी गावी अवखळ द्वाड वा-याने कानात खळे पडावे चंद्राला यावे चांदणे वयात बहरावी रातराणी गंधाळावी सारी रात नभदीप तारकांचे हलकेच व्हावे मंद प्रीतीफुलांच्या श्वासांनी पांघरावा मधुगंध जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

गजरा.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 21/05/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
गजरा..... लांब वेणी * उदास वाटते (* किंवा मोकळे केस उदास वाटतात) केसांत फुले माळ गं जरा ! चेहेर्‍यामागेही सौन्दर्य आहे डोकावून हळूच सांगेल गजरा !
Taxonomy upgrade extras

वेगळाच आहे पाऊस आज

लेखक ओंकार देशमुख यांनी गुरुवार, 21/05/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
http://pune-marathi-blog.blogspot.com/ नमस्कार मराठी जनहो... पहील्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!! पहीला पाउस मातीचा वास यांमुळे एखाद्या कवी मनाला सहजच पालवी फूटते.. माझा कावीमित्र ह्रुषिकेश घारपूरे याची एक सुंदर कवीता आपल्यासाठी पोस्ट करत आहे.. वेगळाच आहे पाऊस आज, हे आकाशही वेगळेच आहे. गर्दी करुन दाटलेल्या ढगांचा इरादाच काय वेगळा आहे! आकाशात उत्साह रंगवणार्या ढगांनी आज मात्र उत्पात मांडला आहे. हा पाऊस आज जरा वेगळाच आहे. ढगांतून बरसणारे हे थेंबसुद्धा गनिमी कावा करीत आहे नेहमी ओल्याचिंब करणार्या सरीं आज कोरडाच स्पर्श करीत

आपण सारे कोट्याधीश!..... नाही होणार!

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 21/05/2009 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
१५०० अब्ज डॉलर!' या विषयावर कांही दिवसांपूर्वी मिपावर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक सदस्यांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते. "१. स्वीस बॆंकेतले पैसे काढून सर्व उधार्‍या (जागतिक बॆंकेच्या कर्जासहीत ) देऊन टाकू आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर प्रश्नांची सोडवणूक करायची." "२.

`गाडी` घसरली, सावरली...

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 21/05/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
साडेसाती एकदा मागे लागली, की तिचं समाधान होईपर्यंत पिच्छा सोडत नाही. गाडी बिघडण्याची साडेसाती अशीच गेले काही दिवस मागे लागली होती. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी पिडल्यानंतरच तिनं पाठ सोडली. आमची मारुती गाडी चालकासह घेऊन आई-वडील रत्नागिरीहून इथे पुण्याला आले होते. माझी मावशीही सोबत होती. त्यांच्यासाठी म्हणून मी रजा टाकली होती. दुसऱ्या दिवशी रांजणगावला जायचा बेत आखला. साधारण 11 वाजता निघालो. घरापासून निघून पुढच्याच चौकात आलो होतो, तर पोलिसांनी गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. मी तर सिग्नल तोडला नव्हता, की झेब्रा क्रॉसिंग तुडवले नव्हते.

कैफियत ....

लेखक बट्ट्याबोळ यांनी बुधवार, 20/05/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली. एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली.

ऒळखीचे भेळवाले

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 20/05/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या कुठल्याही नाक्यावर असतो तसाच आमच्याही नाक्यावर एक भेळवाला होता. ब-याच लहानपणीपासून माझा त्याच्यावर (म्हणजे त्याच्या भेळेवर) डोळा होता. आपण चांगले मार्क मिळवावेत आणि मग आईने “जा, नाक्यावरच्या भेळवाल्याकडून भेळ घेऊन ये” असं म्हणावं असं माझं एक माफक स्वप्न होतं. पण आईपुढे आमची डाळ शिजत नसे. त्यामुळे इव्हसारखंच मलाही त्या भेळेच्या “forbidden fruit” चं कायम आकर्षण वाटत राहिलं. आणि मग एका कोजागिरीला भय्याची भेळ खायचा “दुग्धशर्करा” योग आला आणि मग पुन्हा पुन्हा आला, येतच राहिला. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी “को जागर्ती” असं म्हणत जागत्या घरी जाते असं म्हणतात.

तांबडा रस्सा ( मालवणी पद्धत )

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी बुधवार, 20/05/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१/२ कि. मटण किंवा चिकन ( तुकडे लहान असावे ) ५ कांदे , ३ टमाटो , ५ पाकळ्या लसूण , आलं , लिंबाचा रस . सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं , मीठ लाल तिखट , हळद , तेल इ. मटण स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ आणि लिंबाचा रस लावून १ तास ठेवावे. कढई मधे तेल गरम करून त्यात प्रथम सुखं खोबरं लालसर भाजून घ्यावे मग त्यात लाल सुखी मिरची घालावी, मिरची पण चांगली भाजल्यावर त्यात अख्खा गरम मसाला (धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र) घालावे.