Skip to main content

जॉनी मेरा नाम...

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 18/06/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
उजवीकडला लहान चणीचा जॉनी .(१९५/२००) डावीकडला पहीला . सुजीत (सरंक्षण दलाचे आरक्षण असूनही ओपन कॅटेगरीत येऊन दाखवीन अशी मला खात्री दिली होती (१८०/२००) त्याच्या शेजारी . एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की.

स्वनियंत्रण, संयम - एक प्रस्ताव

लेखक विकास यांनी गुरुवार, 18/06/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्वप्रथम हा प्रस्ताव - चर्चा म्हणून तसेच व्यावहारीक आचरण म्हणून मी नेहमीप्रमाणेच केवळ एक मिपासदस्य म्हणून मांडत आहे. त्याचा संबंध जरी माझ्यासकट सर्वांनी जनात आणि मनात कसे वागावे याच्याशी मुख्यत्वे मर्यादीत असला तरी मिपा संबंधात संपादकांचे विशिष्ठ धागे संपादन करताना धोरण काय असावे या संदर्भात देखील आहे. हा वेगळा काथ्याकुटाचा धागा सुचण्याचे तात्कालीक कारण जरी हिमानी सावरकरांचे पत्र असले तरी तशा अनेक चर्चा येथे चालू असतात. या संदर्भात प्रथम मला सांगायचे आहे की हिमानी सावरकरांचे पत्र आणि विचार मला अजिबात पटले नाहीत आणि मान्य देखील नाहीत.

अननसाचा शिरा

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 18/06/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- १ वाटी जाड रवा पाऊण वाटी अननसाच्या फोडी अर्धी वाटी साजूक तूप १ वाटी साखर दीड वाटी दूध अर्धी वाटी पाणी कृती:- प्रथम एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात अथवा कढईत रवा कोरडा भाजून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात अननसाच्या फोडी घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्यावी. एका कढईत तूप घालून ते थोडे गरम झाले की त्यात अननसाची पेस्ट घालावी. दुसर्‍या गॅसवर एका पातेल्यात दूध आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ८

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 18/06/2009 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

पिंपळपान.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 18/06/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रे नमस्कार ! सकाळी एक छान ईमेल आले , त्यात एक सुंदरसे पिंपळपान होते, ते पाहून सहज काहीतरी(च ?) सुचले ते खरडले आहे.बघा आवडते का ..... पिंपळपान..... तारुण्याचे पिंपळपान त्यावर लिहुनी प्रीतीगान अर्पण करते तुला मुकुंदा, देशील का रे हृदयी स्थान? शीतल वारा अन् जलधारा अशा झोंबती कांतीला, कवेत घेवून मला सख्या रे विसावू दे बाहूवर मान ! विरह तुझा मज मुळी खपेना तुजविण पळभरही करमेना , भरकटते मी तुला शोधण्या मनी मानसी तुझेच ध्यान ! मत्सर वाटे वेणूचा त्या अधरांवर तव विराजमान सांग मला तू , मदनमोहना, कशी सावरू?
Taxonomy upgrade extras

एकलव्य

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 18/06/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
एकलव्य मध्यम बांध्याचा, हसतमुख आणि उत्साही तरुण होता. तो बुद्धिमान होताच, पण त्याचबरोबर, इतरांशीही मैत्रीचे, स्नेहाचे संबंध असायला हवेत असं त्याला वाटत असे. १९९२मध्ये मुंबईच्या ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स’ मधून त्याने आर्किटेक्ट्ची पदवी संपादन केली होती. सात वर्षापासून तो ’पॅरेडाइज कन्स्ट्रक्शन कंपनी’त चीफ आर्किटेक्टच्या पदावर काम करत होता. तो मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे इथपर्यंत पोचेपर्यंत त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. आपल्या योग्यतेच्या बळावर त्याने आपल्या कंपनीत विशेष स्थान निर्माण केले होते. आपले वरिष्ठ मिस्टर द्रोणनाथनना संतुष्ट ठेवण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असे.

प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 18/06/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
"जेणूं काम तेणूंच थाय बीजा करे तो गोता खाय" (मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.) मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो. त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं.

प्रस्ताव...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 17/06/2009 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
..`त्यांनी प्रस्ताव आणलाय... माझ्या जिवाला धोका आहे.' त्याच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. गडचिरोलीच्या जंगलात बांबू तोडायला गेलेला तो कुणा नातेवाइकाच्या सांगण्यावरून नक्षलवादी टोळीत दाखल झाला आणि तिथल्या वास्तवाचे चटके नंतर त्याला असह्य होऊ लागले. पण, परतीचे दोर कापले गेले होते. तो नक्षलवादी चळवळीत गुरफटला होता. उदरनिर्वाहाचं काहीच साधन हातात नव्हतं. खस्ता खातच बायकोनं कधीतरी अंथरूण धरलं आणि खंगत जग सोडलं. `दोन मुलांना मागं ठेवून ती निघून गेली. मुलं भुकेनं केविलवाणी झाली, की डोकं भणभणून जायचं आणि मुलांना उपाशी झोपवून मी घराबाहेर पडायचो...

आज का

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 17/06/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज का मुरलीधराच्या पावरीची साद नाही? आज का राधे तुझ्याही पैंजणांचा नाद नाही? शब्द झाले मूक, जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा मौन झाले बोलके; मग सांग, हा संवाद नाही? हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही निर्गुणी भजने कुमारांची कधी ना ऐकिली तू, भीमसेनांच्या स्वरांचा घेतला आस्वाद नाही! सोड हे सुकणे, फुलांची पालखी दारात आली स्वागताला हो पुढे, यासारखा आल्हाद नाही या तुझ्या असण्यास वा दिसण्यास का जगणे म्हणावे? खोलली त्याने कवाडे, अन् तुझा प्रतिसाद नाही! आज छेडू या सुरांना, विसरुनी चिंता उद्याच्या आजचे गाणे खरे, येथे उद्याला दाद नाही!
Taxonomy upgrade extras