वांद्रे वरळी सागरी सेतु
आज अखेर वांद्रे वरळी सागरी सेतु वापरण्यासाठी खुला झाला. बरीच वर्ष हे काम चालु होत. पण आज अशी बातमी आहे कि या सेतुला स्व. राजी व गांधी यांचे नाव देण्यात येत आहे. माझ्या माहीती प्रमाणे हया सेतुची पायाभरणी शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाली होती आणी ह्याचे नाम करण स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतु असे त्यावेळी करण्यात आले होते. मग आज अचानक राजी व गांधी यांचे नाव कसे पुढे आले. आणी हे नाव पुढे करणारे पहिले शरद पवार आणी हि घोषणा करणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. हे कोंग्रेस वाले त्यांचा सावरकर द्वेष कधी थांबवणार आहेत?
मिसळपाव
जागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही.
बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते.
अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.