Skip to main content

...उदयात शोध काही!

...उदयात शोध काही!

Published on 23/03/2009 - 10:03 प्रकाशित मुखपृष्ठ
चार मायेचे उत्साहाचे शब्द निराश मनाला शांत करण्यास उपयोगी पडतातच. उभारीची ताकद तर पंखात असतेच. जाणिव फक्त परत व्हावी लागते. :) अजुनी उदास का रे बोलावयास काही? की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही? नेहमीच सूर्य दिसतो अस्ताचलास तुजला.. चैतन्य जागवाया, उदयात शोध काही! पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा.. फुलवावयास माती सरतात जन्म काही! घे कुंचला मनाचा रेखावयास जगणे रंगांत डुंबणारे आहे अजून काही! ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू! भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही! प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे.. स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!! शुभम्
लेखनविषय:

याद्या 4533
प्रतिक्रिया 19

छान आहे कविता. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

नेहमीच सुर्य दिसतो अस्ताचलास तुजला.. चैतन्य जागवाया, उदयात शोध काही! पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा.. फुलवावयास माती सरतात जन्म काही! ... खूपच छान सुंदर (गझल)कविता ... आवडली !!!

In reply to by मनीषा

गझल म्हणावयास मन धजावत नाही. गझलेचे काटेकोर नियम सांभाळायचे अन् गेयताही उत्तम ठेवायची ही तारेवरची कसरत नाय ब्वॉ अजून जमत. त्यामुळे गझलकारांच्या प्रतिभेला (सध्यातरी)दूरूनच सलाम.. कारण अजून ती मंझिल जरा दूर आहे :) (गझलप्रेमी) राघव

वा क्या बात है ! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

नितांत सुंदर कविता!!! सकाळीच बघितली होती. सावकाशीने परत वाचली. खूपच सकारात्मक आणि आशावादी कविता. बिपिन कार्यकर्ते

प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही! खूपच खास! प्रत्येक ओळीचा अर्थ अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

नेहमीच सुर्य दिसतो अस्ताचलास तुजला.. चैतन्य जागवाया, उदयात शोध काही! व्वा... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

वणवा, माती फुलवणे, जन्म सरणे - क्या बात है! ... उदयात शोध काही सुद्धा सुंदर. कविता फार आवडली. (उदयोन्मुख)बेसनलाडू

शब्दच नाहीत. आशादायी आहे कविता/गझल. पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा.. फुलवावयास माती सरतात जन्म काही! सुरेख. शिवाय ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू! भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही! हे म्हणजे कळस आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा.. फुलवावयास माती सरतात जन्म काही! ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू! भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही! या ओळी केवळ अप्रतीम! राघवदादांनी अतिशय सुंदर काव्य केले आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.. तात्या.

तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद वाचून खूप छान वाटले. सगळयांचे मनापासून आभार. :) राघव

प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे.. स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!! क्या बात है !

कविता एकदम छान आहे.. येऊ द्या अशा अजुन.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!