Skip to main content

क्षण.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी रविवार, 22/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण ! कणकण जळे अन, क्षणक्षण झुरे.. झाला जीव सखे वेडा.. तुझ्या पायी ग.. भरुभरु डोळे बघ, वणवण फ़िरे.. आता इथे-तिथे-कुठे.. ठाई ठाई ग.... तुझ्याविना जग सारे, उदास भकास, गेला हरवुन सूर.. अन हरपले गाणे.. जगताना आणि सांग,किती वेळा करायचे,रोजरोज तेचतेच,खोटे ग बहाणे एका तुझ्या भेटीपायी,वेड्या वेड्या आशेपायी,उरे श्वास उरे जीव,काही ग.. कण कण जळे अन....... [१] तुझी मीठी गंध-धुंद,उश्ण श्वास धपापला,क्रिश्णमेघी केसांची ग छाया... हरवलो हरपलो,आणि विसरुन गेलो,सखे दोन जीव,एक काया.. माझ्या देही तुझा गंध,तुझा माझा एक श्वास,दोन कुडी एक प्राण,ठाई ग.. कण कण जळे अन........ [२] आता उरी आठवणी,ओठी विरहाची गाणी,तुझी माझी अधुरी कहाणी... उमलण्या आधी प्रीत ,गेली कोमेजुनी,विरे वार्‍यावर एक विराणी... आठवांचा थवा,निळ्या आभाळी चांदवा,मज छळावया माथी येई ग... कण कण जळे अन........[३] भग्न ह्रदयात माझ्या,तरी बघ जळणार,प्रेमाची ग तुझ्या-माझ्या ,ज्योति... कुडी मध्ये श्वास अन,डोळयामधे आस असे,तोवरी ग,तुझी-माझी,प्रीति... एक क्षण पुरे मज,पुरुनिया उरे अग,आयुश्यही त्याच्यावर जाई ग... कण कण जळे अन........[४] - चंद्रशेखर
लेखनविषय:

वाचने 1748
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by मनीषा

आभारि आहे ! बाकिच्या कविता वाचल्यात का ? वाचुन जरुर कळवा !

कविता आमचा प्रांत नाहि. पण तुमचे नाव फार आवडले महामुनी! अगदी एखाद्या गंभीर कवीला शोभेल असे आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

In reply to by धमाल नावाचा बैल

तुम्हाला आमचे नाव फार आवड्ले हे वाचुन छान वाटले ! शुभेछ्छां बद्दल धन्यवाद !

कविता आवडली, छान आहे.

आवडली. नेहमीप्रमाणेच छान कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}