Skip to main content

रगडा पॅटिस (फोटु सहीत)

लेखक समिधा यांनी सोमवार, 23/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
हा पदार्थ ह्या आधी मि.पा.वर दिला आहे,पण माझी पध्द्त थोडी वेगळी असल्याने मी पण देत आहे. पॅटिसः साहित्यः बटाटे ३-४ हळद,तिखट्,मिठ, चविनुसार ब्रेड स्लाईज २ तेल पॅटिस भाजण्यासाठी कृती: बटाटे उकडुन मॅश करुन घ्यावेत. त्यात हळद,तिखट्,मिठ आणि पाण्यात भिजवुन काढलेले ब्रेड स्लाईज घालुन मस्त एकजिव करावे हव्या त्या आकाराचे पॅटिस बनवुन तेलावर भाजुन घ्यावेत. रगडा साहित्यः पांढरे वाटाणे २ वाटी (रात्रभर किंवा ६-७ तास भिजवुन ठेवावेत.) तिखट, छोले मसाला, मिठ ,चविनुसार मोहरी आणि हिंग थोडस. कांदा १(बारिक चिरलेला) टोमॅटो १ बारिक चिरुन तेल अंदाजे कृती: भिजवलेले वाटाणे कुकर ला शिजवुन घ्यावेत. एका भांड्यात तेल तापत ठेउन त्यात मोहरी, हिंग, हळद आणि कांदा घालुन खुप परतावे. नंतर टोमॅटो घालुन त्यावर आवडीप्रमाणे तिखट,छोले मसाला घालावा. मग शिजवलेले वाटाणे घालावेत. शेवटी मिठ घालुन मस्त उकळावे. इतर साहित्यः चटणी,बारिक चिरलेला कांदा,कोथिंबीर आणि शेव चटणी: साहित्यः भिजवलेलीचिंच आणि खजुर, गुळ,मिठ्,तिखट्,थोडासा पुदिना कृती: वरिल सर्व साहीत्य एकत्र मिक्सर मधुन काढावे. एका बाऊल मध्ये पॅटिस मग रगडा त्यावर चटणी ,कांदा,कोथिंबीर्,शेव घालुन तयार करावे. नंतर गरमागरम रगडा पॅटिस वर ताव मारावा. ;)

वाचने 14644
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

सही फोटो.. आता जेवण झाल आणी आता परत भूक लागली.

In reply to by लवंगी

येतेस का खायला? समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

In reply to by लवंगी

नक्की ये.... :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

खुपच छान! करुन पहातो...आणि खातो, लवकरच!

फोटूसहित असलेली पाकृ छानच! माझी आवडती पाकृ असल्याने एक दोन दिवसात करीनच. रेवती

पण यात नेमकं वेगळं असं काय केलं आहेस?? मीही पॅटिस असेच करते आणि रगडाही असाच करते. मला वाटलं वेगळी पाकृ म्हणजे तू वाटाण्यांऐवजी छोले चा रगडा करतेस की काय?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अग आकांक्षाने केलेल्या पाकृ.पेक्षा थोडी वेगळी आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मस्तच . . शेवटचा फोटु पाहुन भुक लागली . . :P (भुक्या) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

समिधा, जियो..! पाकृकरता शब्द नाहीत...! आम्ही जे शब्द वापरतो ते आमच्या काही सुहृद आणि हितचिंतक मैत्रीणींना पसंद नाहीत! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आम्ही जे शब्द वापरतो ते आमच्या काही सुहृद आणि हितचिंतक मैत्रीणींना पसंद नाहीत! छान झाले. धन्यवाद! पाककृती आणि फोटो छान.

भाजण्यापुर्वी थोडे रव्यात किंवा खसखशीत घोळवुन मग तेलावर भाजा. मग सांगा कसे लागते ते प्याटिस. येकदम ढासु लागल बगा.

मला घरी करायचच होतं पण कृती मिळत नव्हती धन्यवाद आणि मस्त फोटु....... =P~ "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

फोटो पाहुन खावासा वाटत आहे.मी थोद्या वेगळ्या प्रकार वापरुन रगडा करते. थोडा अख्खा गरम मसाला भाजुन मिक्सर मधुन काढुन फ्राय करते.त्याने छान चव येते.

पाककृती छान आहे. :) :) :) आणि फोटो पाहून तर आताच करावीशी वाटते.. आता जाते आणि एकदाची करुनच येते... धन्यवाद =D> =D> =D>

फोटो मस्तच :) मी वाटाण्याच्या भाजीत छोले मसाला वापरत नाही, वाटप लावते खोंबरे/कांदा याचे, आता तुझ्या पध्दतीने करून बघेन. :)

आहाहा...च्यामारी असे चटकदार फोटो पाहिले की जाम भूक लागते...:) (खादाड) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

माझी आवडती डिश! एकदम बढिया! फोटो तर भन्नाटच आहेत. खास करून शेवटचा खूप मस्त आहे. [माझ्या लेकीला तो पाहून पुन्हा भूक लागली!] क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

कालच जेवणाच्या वेळेस पाहीली ही पाकृ! इतकी भूक लागली की प्रतिसाद द्यायच्या आधीच स्वयपाकाला पळून गेले.. आज जरा भरल्या पोटी लिहीते.. मी हा प्रकार स्वतः करण्याच्या ऐवजी तुझ्याकडे येऊन आयते खाणं पसंत करेन! :) केव्हा येऊ?? http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

कधिही ये ,तु आल्यावर पुन्हा बनवेन. :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

माझा आवडता पदार्थ..छोले मसाला + पांढरे वाटाणे वापरून कधी केला नाही रगडा. आता करून बघेन. चकली http://chakali.blogspot.com

मस्त दिसतेय रगडा पॅटिस...