अण्णांचा आशीर्वाद
शिर्डीहून संगमनेरकडे परतताना निमगाव जाळीजवळ आमच्या लाल-पिवळ्या मारुती ओम्नीनं झटका घेतला आणि मी एकदम जागा झालो. गाडी पट्टी सोडून रस्त्याच्या कडेला आली होती. ड्रायव्हर भेदरलेला दिसत होता. थोडेसे सैलावलेले दहा-बारा प्रवासीही झटक्यात जागे झाले होते.
एक अवजड ट्रक आम्हाला हूल देऊन भन्नाट वेगानं पुढे गेला होता...
मिसळपाव