Skip to main content

मिपा न आवडणार्‍यांकरता सप्रेम भेट...:)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 07/07/2009 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मिपा हे संस्थळ सर्व मायबाप मिपाकरांचं अत्यंत ऋणी आहे आणि यापुढेही राहील. मिपाकरांशिवाय मिपाला शोभा नाही असेही आम्ही वेळोवेळी म्हटले आहे. परंतु असेही काही जण आहेत की ज्यांना मिपा आवडत नाही. हरकत नाही! या जगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडलीच पाहिजे असा काही नियम नाही. पण मग करायचं काय? मिपा तर काही बदलणार नाही. त्यामुळे ज्यांना मिपा आवडत नाही त्यांचा पूर्णत: आदर करून त्यांना मिपा प्रशासनातर्फे खालील वस्तु सप्रेम भेट देण्यात येत आहे. ती घालायची आणि चालू पडायचं! :) काय म्हणता?

एक धुकाळ सहल!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 07/07/2009 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
tahini 5th july 09 063 ताम्हिणीत जाण्यात "रिस्क' होती. दरवर्षीप्रमाणे दणकून पाऊस, दरडीबिरडी कोसळण्याची भीती म्हणून नव्हे. तर अजिबात पाऊस नसल्याच्या बातम्या होत्या म्हणून! जूनपासून पावसाची वाट पाहूनपाहून थकलो होतो. गाडीतून दोन ट्रिपा केल्या, दोन्ही कोरड्या! जेजुरी आणि कार्ला इथे घामानं पुरेवाट झाली होती.

भागवत सर

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 06/07/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
(विनंती- सध्या कॉलेजची परिक्षा सुरु असलेने लेख जरा गडबडीत लिहिला आहे,समजुन घ्यावे ही विनंती.) उद्या गुरुपौर्णिमा.गुरुला वंदन करायचा दिवस. उद्या अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होतील, वंदन वगैरे केले जाईल्, आणि गुरुंचे गुणगान गाईले जाईल ,जे अतिशय योग्य असेल. पण यावेळेस मी मात्र माझी गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहे. मागच्या वेळी मी गुरुपौर्णिमेला शिक्षकांवर एक लेख लिहिला होता.(अर्थात तो सकाळ मध्ये शिक्षक दिनाच्या वेळी प्रसिद्ध झाला हा भाग अलहिदा)पण यावेळी मी माझे जीवन बदलणार्‍या एका सरांबद्दल लिहिणार आहे.

पाहतो आहे ....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/07/2009 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
थांबलेला आसवांचा पाऊस पापण्यांशी, मी तुझ्या बरसण्याची, वाट पाहतो आहे ! झगडलो वेदनांशी कोंडुन जाणीवांना, आठवांचा आज प्रिये, थाट पाहतो आहे ! ओसंडु पाहे कसा गुदमर मनातला, थोपवली भावनांची, लाट पाहतो आहे ! ओथंबले काठ अता डोळ्यांचे सखे, मोडुनी चौकट वाहे, पाट पाहतो आहे ! संपले ते उजळणे पुन्हा मनोरथांचे, गातात दु:ख सुखाने, भाट पाहतो आहे ! विशाल

अश्वमेध

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/07/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
खुप वर्षापुर्वी कॉलेज संपले तेव्हाच स्केचिंगही सोडुन दिले होते. काही दिवसांपुर्वी नाशिकला जाण्याचा योग आला. एक स्नेही श्री. सी.एल. कुलकर्णी यांच्याकडे गेलो होतो. तिथे त्यांचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने उर्फ धनुकाकांशी ओळख झाली. त्यांच्या प्रेरणेने पुन्हा स्केचिंग करायला सुरुवात केली आहे. माझा पहिला प्रयत्न...

मिपाभारत

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 06/07/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अ‍ॅंड परा थोपडा. मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार) मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव फायनान्स : तात्या भयंकर स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते. बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते. टारझन भीमाच्या बाजुला उभा होता.

म्हमद्या !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/07/2009 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेहेमीच्या लोकलने सायनला उतरलो. स्टेशनच्या बाहेर पडताना नेहेमीप्रमाणे आपसुकच मागच्या खिशावर हात गेला. खिश्यातलं पाकीट जागच्या जागी असल्याची खात्री झाली आणि एक निश्वास सोडला. हुश्श .... चला आता संध्याकाळपर्यंत तरी काळजी नाही.... अगदी नेहेमीप्रमाणेच. नकळत एक सुस्काराही सोडला गेला.... अहं, म्हमद्या आता कधीच दिसणार नव्हता. मी काही कुणी सराईत लेखकू नाही, त्यामुळे जे सांगायचय ते सरसकट सांगणार आहे. सांभाळुन घ्या. मी अंबरनाथला राहातो. रोज सकाळी सात वाजता घरातुन बाहेर पडायचे, लोकल पकडुन सायन गाठायचे.

पैशाने पैसा वाढतो.

लेखक सदानंद ठाकूर यांनी रविवार, 05/07/2009 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाने पैसा वाढतो. जर पैसे मिळवणे हा जन्मसिध्द हक्क प्रत्येकालाच प्राप्त आहे हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हेहि मान्य करण्यास हरकत नसावी कि एका सर्टन स्टेज नंतर पैसा सुध्दा पैसे मिळविण्याचे काम करु शकतो. आता हेच पहाना प्रथमतः आपण पैसे ममळवण्यासाठी काय काय करतो ते वेगळ सांगावयाची जरुरि नाही तुम्ही ते केलेलेच आहे व अनुभवले सुध्दा आहे. आता तुम्हि थोडे स्टेबल झाला आहात. थोडी बचतहि करु लागला आहात.

दी अनटोल्ड, अनसीन ऑफ मुंबई टेरर ऍटॅक...

लेखक कळस यांनी शनिवार, 04/07/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
बाप रे !! धक्कादायक ...हॉरीबल ...लिहायला शब्द नाहीत ... हे सर्व वीडियो खूपच विचलित करणारे आहेत. पाहिल्यानंतर प्रचंड चीड,संताप येतो . अस्वस्थ होतो. त्रास होतो. सुन्न होतो.