Skip to main content

पुरोगामी/लिबरल म्हणजे तरी काय?

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 08/07/2009 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
(दोन दिवसांच्या अ‍ॅब्स्टेन्शननंतर पुन्हा - नवीन नावाने - प्रवेश) सध्या मिपावर विविध धाग्यांच्या निमित्ताने 'पुरोगामी असणे' हा विषय चर्चिला जात आहे. पुरोगामी लोकांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत काही सदस्यांच्या भावना तीव्र होऊन त्यांनी त्यांचा धिक्कार करणार्‍या सह्या निर्माण केल्या. ज्यांनी या सह्या आपल्या प्रतिसादात वापरल्या ते प्रतिगामी आहेत का? तर नाही त्यांच्यातल्याच अनेकांनी 'स्त्रियांचे कपडे' टाइप अनेक धाग्यांवर पुरोगामी म्हणता येतील अशा स्वरूपाची मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे माझ्या मनात जे वैचारिक मंथन झाले त्याचे हे प्रकटन आहे.

खुळ्या भिंगोर्‍या

लेखक नीधप यांनी बुधवार, 08/07/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मगाशी एका पुस्तकाची माहीती टाकली त्या धाग्यावर आणि माझी एक जुनी कविता आठवली. माझ्या ब्लॉगवर आहे. ती परत इथे डकवतेय.
Taxonomy upgrade extras

प्रिय सौ. लेकीस...

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 08/07/2009 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
"प्राजूची “प्रिय सौ. आईस” वाचून सुचलेलं काहीतरी...एका आईचं मनोगत. ही मी केलेली पहिलीच कविता(?) असल्याने चु.भु.द्या.घ्या.

नवा वाद नवा तमाशा राज्य सरकारचा

लेखक mamuvinod यांनी बुधवार, 08/07/2009 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देऊन व सागरी सेतुला राजीवजीचे नाव देउन राज्य सरकारने नवा घोळ घातला आहे, मिपाकराना हे मान्य आहे का कि महत्त्वाच्या प्रकल्पाना फक्त काँग्रेसच्याच नेत्याचे नाव दिले जात आहे.

पवारांच्या ताटाखालचे मांजर

लेखक अ-मोल यांनी बुधवार, 08/07/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या सकाळमध्ये मेधा पाटकरांच्या महत्वाच्या पत्रकार परिषदेची बातमी का नाही? लवासा कॉर्पोरेशनमध्ये पवारांचे हितसंबंध गुंतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या वाचकांना ही माहिती देण्याची जबाबदारी आपल्यावर नाही असा सकाळचे माननीय मुख्य संपादक यांचा समज आहे का? अलिकडे सकाळमध्ये अशा पवारांना जड जाणार्या बातम्यांची वारंवार मुस्कटदाबी होत आहे. ७५ वर्षांची परंपरा सांगण्याचा अधिकार अशा वृत्तपत्रास आहे काय? ही वाचकांची प्रतारणा नाही का ? मग सामना, प्रहार ही वृत्तपत्रे परवडली. आम्ही ठाकरे आणि राणेंची मुखपत्रे आहोत हे ते बिनधास्तपणे मान्य तरी करतात.

फोक

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 08/07/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
तोच जुलै महीना, तेच पालक, तोच मी ,तेच तेच प्रश्न. एक शिक्षण सम्राटांनी माझ्या सर्व अटी मान्य करुन १० वी पास विद्यार्थी आणि त्यांच्या पालका़करता २० कार्यक्रम ठेवले आहेत. कुठल्याही प्रकारची जाहीरात बाजी न करता हे कार्यक्रम होणार होते.

(प्रिय सौ. सासुबाईंस..!)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 08/07/2009 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
आधार: प्राजूताईंची कविता (आणि फालतू सास-बहू टिव्ही सिरीयल्स) (पस्तूत विडंबनात मला प्राजूताईंच्या कवितेची माझी भ्रष्ट नक्कल व त्यातील आईसारख्या (तसेच सासुबाईंसारख्यासुद्धा) व्यक्तींची टिंगल करण्याचा अजीबात हेतू नव्हता. प्रत्येक आई आदरणीय आहे, वंदनीय आहे. माझा कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही. मी केलेले विडंबन हि फक्त कल्पना समजावी.) माझं तुमच्यासोबत असणं.. तुमच्या (खोट्या)कौतुकात माझं बुडुन जाणं.. तुमच्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी मी माझ्या पार्लरच्या कामांना बाजूला ठेवणं.. संपूर्ण आयुष्यभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!! पण...
Taxonomy upgrade extras

पुरोगामित्वाची चढाओढ ही तितकी वाईट नाही

लेखक धनंजय यांनी बुधवार, 08/07/2009 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
मागे दुसर्‍या एका मराठी संकेतस्थळावर "समलैंगिकता आणि समाज" चर्चा चालू होती, तिथे "डीजे" या आयडीखाली मी पुढील प्रतिसाद दिला होता. (त्या संकेतस्थळावर "धनंजय" हा आयडी उपलब्ध नाही, म्हणून वेगळा आयडी घेतला.) बारीक सारीक बदल करून - म्हणजे मिसळपावावरील माझ्या लेखाचा दुवा देऊन, तो प्रतिसाद येथे देत आहे. - - - एका सामाजिक विषयावर चर्चा चलली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे मतमतांतरे ऐकू येत आहेत. या विषयाच्या अनुषंगाने आत्मकथन मी मिसळपावावर केले आहे.