झटपट बॅचलर पिझ्झा
छोट्या डॉनने पिझ्झा हटमधे घालवलेल्या संध्याकाळवर टाकलेला लेख वाचला आणि माझी पिझ्झा खायची इच्छा जागृत झाली. वाढत्या वजनामुळे लई दिवसांपासून पिझ्झा खाणे बंद केलेले आहे. विकतच्या पिझ्झ्यात एकतर भरपूर कॅलरीज असतात, शिवाय मैद्याचा बेस म्हणजे भरीत भर! तरी अधे-मधे कधी लहर आलीच तर विकतच्या पिझ्झ्याला पर्याय म्हणून एका बॅचलर पिझ्झ्याला बर्याच दिवसांपुर्वी जन्म दिलेला होता... तोच आज करायचा ठरवला. याची चव ही विकतच्या पिझ्झ्याच्या जवळचीच, कॅलरीज् पण कमी... आणि अगदी लवकर व कमी कष्टात होणारा आहे हा पिझ्झा!
पिझ्झ्यासाठी काय लागतं? जास्त काही नाही...
मिसळपाव