कार्यबाहुल्या मुळे गेले काही महिने जालावर फारसा वावर करता आला नाही.. आज थोडा निवांत वेळ मिळाला आणि आमच्या गुरुजींना केलेले खोडसाळ गंड काव्य आमच्या वाचनात आले . ते वाचून आम्हाला ही गंड झाला ..
मी कवी आहे, मला ही कंड आहे
फक्त वृत्ता चा मला हा गंड आहे
'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!
वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे
चांगल्या मिळती न आता जमीनी
ह्या मुळे धंदा विडंबन थंड आहे
मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो
वृत्त अन बाराखडी हे बंड आहे
बोलले काका, मुळी हे काव्य नाही
जाउ दे तो गर्व, अन पाखंड आहे
कैकदा निवृत्त मी झालो तरी ही
शमत नाही हा विडंबन कंड आहे
'प्रौढ' ह्या वाचू नको "केश्या" कविता!
संपले नाही तुझे पौगंड आहे...
मी कवी आहे, मला ही कंड आहे
फक्त वृत्ता चा मला हा गंड आहे
'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!
वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे
चांगल्या मिळती न आता जमीनी
ह्या मुळे धंदा विडंबन थंड आहे
मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो
वृत्त अन बाराखडी हे बंड आहे
बोलले काका, मुळी हे काव्य नाही
जाउ दे तो गर्व, अन पाखंड आहे
कैकदा निवृत्त मी झालो तरी ही
शमत नाही हा विडंबन कंड आहे
'प्रौढ' ह्या वाचू नको "केश्या" कविता!
संपले नाही तुझे पौगंड आहे...
याद्या
3776
प्रतिक्रिया
15
लेखनविषय:
मिसळपाव
जोरदार
हाहाहा
लई भारी गुर्जी!
कैकदा
मस्तच!!
वा ! मस्त !!
लै भारी...
यावे यावे...
धन्यवाद!
लै लै लै लै .......लै भारी.
विडंबन कंड आहे. .
झकास्...झकास....
ह्या एकदोन दिवसात जुन्या जाणकारांचे बहारदार पुनरागमन झाले
एक नं !!
वा!