एक टरकावणारा अनुभव
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते.
वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्यापैकी मास्-बेस बाळगुन.
मिसळपाव