Skip to main content

मुक्तक..

प्रकाशित मुखपृष्ठ
मला नाही वाटत बरं तूच हातानी जेवुन घे ना बाळा.... काप-या स्वरात आई बोलली.... केवळ तिच्या समाधानासाठी मी कशीबशी खिचडी खाल्ली बेसिन मध्ये हात धुताना.. डोळ्यातिल आसवं हातावर ओघळली...! बरं वाटेल ना तिला..? मनात शंकेची पाल चुकचुकली...!!!

याद्या 1664
प्रतिक्रिया 5

लेखनविषय:

का रे बाबा!! असा काही नको रे विचार करू!! आवडलं! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

केवळ तिच्या समाधानासाठी मी कशीबशी खिचडी खाल्ली या दोन ओळी कवितेतून वगळल्या असत्या आणि बेसिन मध्ये हात धुताना.. च्या ऐवजी बेसिनमध्ये नळाच्या पाण्याचा आवाज करताना असा काहीसा बदल केल्यास अधिव रंजक/भावुक कविता झाली असती, असे वाटते. अर्थाचे अनेक पदर लाभले असते; वाचकांच्या कल्पनाशक्तीलाही चांगला वाव मिळाला असता. चू भू द्या घ्या (मातृभक्त)बेसनलाडू