मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्फुटक..

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पेन घेतलं...? पाकिट .. चश्मा..? तिचे नेहमीचेच प्रश्न .. माझी उत्तरे ठरलेली.. आता.. ती नाही.. उत्तरे आहेत.. पण.. प्रश्नच नाहीत......!!

वाचने 3021 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by प्राजु

शितल Mon, 04/20/2009 - 19:01
सहमत. :) स्फुटक आवडले. :)

In reply to by धनंजय

बेसनलाडू Tue, 04/21/2009 - 03:22
ती नाही हे वगळले असते तर स्फुटिका अधिक खुलली असती का (प्रश्न नाहीत पण उत्तरे आहेत = ती नाही असे इम्प्लिकेशन् ... त्यायोगे ती नाही म्हणजे कोठे गेली, ती असली तर प्रश्न का नाहीत, असे प्रश्न नि त्यातून येणारी मजा इ.), असा विचार करतो आहे. (सहमत)बेसनलाडू

क्रान्ति Mon, 04/20/2009 - 19:08
चुटपुट लावणारा अनपेक्षित शेवट खासच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com