लट उलझी सुलझा जा बालमा ...
तात्यांनी दर्शनी पानावर यु-ट्युब वरच्या त्याच्यांच सदस्यत्वात अपलोड केलेल्या तेलगु गाण्याची माहिती दिली. सहज उत्सुकता म्हणुन तात्यांनी अजुन काय यु-ट्युबवर ठेवले आहे पाहीले तर " बिहाग " रागातली " लट उलझी .. " ही तात्यांनी गायलेली अफाट लोकप्रिय बंदिश सापडली... क्या बात है..!! मग काय आजच्या दिवसाचे तरी खाद्य मिळाले मेंदुला..
बिहाग हा एक शृंगारीक राग..
तो फार दिवसांनी घरी परततोय..
"ती आतुरतेने वाट पाहात असेल" लवकर पोहचावे म्हणून तो आडमार्गाने जाणारी पायवाट पकडतो..
झाडी-झुडपातून जाणारी वाट.. मधे एक छोटासा ओढा लागतो.. अन तो थबकतोच . कारण पलीकडे ती उभी आहे..
मिसळपाव
ह्यांच्या बदल मी पामर काय लिहणार.... !
