Skip to main content

शुक्रवारची कहाणी .....

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 21/08/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार....... अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता वार्.....विकांताची सुरवात करणारा असा हा दिवस.... तर अशा या शुक्रवारची कहाणी काय आहे महितिय??? .......वाचा खाली.... एक आटपाट नगर होतं.......(हो हो...एकदम डान्रावांच्या सजावटी सरखं..........) तिथं खूप कंपन्या होत्या बहुतेक सगळ्या आय टी वाल्या....त्यात सगळे नगरवासी काम करायचे.... अशाच एका कंपनीत एक 'क्ष' कामाला होता...हा क्ष एकदम हरहुन्नरी . कायम कमात मग्न असायचा....दर २ महिन्यांनी एक तरी बक्षीस पक्कं असायचं..

कलमी झाड

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 21/08/2009 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
माहीत नाही खरी माती एकसारखी नसलेली छाती खरे रुपडच माहीत नाय कलमी झाडाच काय खरं नाय हापुस पण नाय पायरी पण नाय नवीन आंब्याची जातच माहीत नाय धड शाहण पण नाय अन येडं पण नाय कलमी झाडाच काय खरं नाय काय द्यायच अन काय घ्यायच माहीत नाय मी कुठला अन मी कसला माहीत नाय दिसतय भारी पण आतुन खोकडं कलम केलेल झाडच वाकडं गावात पण टिकना अन इलायत पण जमना अर्धे गावरान अन अर्धे इलायती रुपडं कलम केलेल झाडच वाकडं तिकडच्या मातीचा पण झालो नाय अन ह्या मातीत पण उरलो नाय नाव जरी झालं सगळीकडे प्रेम कुठलच मिळालं नाय

अतुलचा भयगंड

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 21/08/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पूर्वी खाडिलकर राहायचे.नंतर ती जागा विकून ते गोरेगांवला राहायला गेले.खाडिलकरांचा एकुलता एक मुलगा अतुल तेव्हा खूपच लहान होता.त्याचे आईवडिल त्याला खूपच जपायचे.मी खाडिलकरांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा नेहमीच ते अतुलच्या घाबरून रहाण्याच्या संवयीबद्दल काळजी करीत असत. "ह्याचं पुढे कसं होणार?" ही त्यांची नेहमीचीच काळजी. मला आठवतं मी त्यांना नेहमी म्हणायचो, "जसा तो मोठा होईल तसा सुधारेल" अतुलच्या वडीलांना हे ऐकून बरं वाटायचं.मला म्हणायचे, "तुमचं म्हणणं बरोबर आहे.मी उगीचच काळजी करीत असतो.सर्व अंगावर पडल्यावर त्याला जबाबदारीने वागावं लागेल." इतर मुलांच्याबरोबरी

... आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना?

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 21/08/2009 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाडगावकरांचे हे शब्द कदाचित भारतीय फुलांसाठी लागू होत असतील परंतु, लिलीसारख्या मूळच्या परदेशी फुलाला हा संयम मान्य नसावा! पावसाळा सुरू झाला की एरवी आठ महिने गुपचूप बसलेली लिली बहरू लागते. गुलाब, मोगरा आदी फुले प्रथम बरेच दिवस कळ्यांच्या स्वरूपात असतात आणि हळूहळू त्यांचे फुलात रुपांतर होते. पण ह्या लिलीचे सगळेच निराळे. संध्याकाळ झाली की, त्या कळ्या अगदी धुसमुसळेपणाने उमलतात. त्याचीच एक झलक.........

कालाय तस्मै नम:?

लेखक चौफेर यांनी शुक्रवार, 21/08/2009 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
वैताग आलाय साला या रूटीनचा! ऑफिसात मानेवर दगड ठेवून काम करावं लागतं अशातला भाग नाही. पण बराचसा वेळ खर्डेघाशीत जातो, एवढं नक्की. सकाळी दहापर्यंत आवरून जे ऑफिसात पोचायचं, ते तिथून सात-आठला बाहेर पडेपर्यंत इतर काही करण्याची फुरसत नसते. रात्री दमूनभागून घरी आल्यावर कुणाकडे जाण्याची किंवा कुणाला फोन करण्याची एनर्जी नसते. आल्यावर कुलवधू नाहीतर सारेगमप नाहीतर सच का सामना करावा लागतो. काही नाइलाजानं बघावे लागणारे, तर काही दुसरा टाइमपास नाही, किंवा छंद जडलाय म्हणून बघितले जाणारे कार्यक्रम. दिवसभराचं रूटीन हे असं. गावाला होतो, तेव्हा मजा होती. टीव्ही वगैरे भानगड नव्हती.

न्यास

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 21/08/2009 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
या जिवाला एक ज्याचा ध्यास होता तोच की त्याचा खुळा आभास होता? भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी, सक्तमजुरी आणि कारावास होता रंगलेल्या मैफली उधळून जाणे हा कुणाचा सांग अट्टाहास होता? चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी गोंदलेला आमरण वनवास होता हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता

भाजप नक्की कोणता ?

लेखक हरकाम्या यांनी गुरुवार, 20/08/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भाजपचे विचारमंथन चालु आहे.त्यात भाजपला लोकसभा निवडणुकीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची कारणे शोधण्याचे काम चालु आहे.एकीकडे वसुंधरा राजे आपले शक्तीप्रदर्शन करतायत तर ज्येष्ठ नेते श्री. जसवंतसिंह यांनी पुस्तक लिहिलेले आहे. त्यावर वेगवेगळे नेते आपाअपली मते देत आहेत.. भाजप अध्यक्ष यांनाही जसवंतसिंह यांनी जिनांविषयी लिहिलेले आवडलेले नाही. खुद्द भाजपच्या नेत्यांनाही जसवंतसिहांची जिनांविषयीची मते पटलेली नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी तर जसवंतसिंहाना घरचा आहेर दिलेला आहे. याच्या आधी भाजपचे नेते श्री.

सूर्याजवळ जाण्याची हिम्मत !

लेखक कळस यांनी गुरुवार, 20/08/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी १३:३० च्या सुमारास हिन्जवडीतून (पूण्यातूनही ) खालील विस्मयकारक चित्र दिसले. यात सूर्याभोवती मोठी रिंग दिसली. आणी मोबाईलवरुन घेतलेल्या फोटोत सूर्याजवळ एक छोटासा गोळा दिसला.

(आपल्याच) धाग्याचा खफ

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 20/08/2009 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी: प्रथम एक विषय घ्यावा. वर्तमानपत्र, ब्लॉग्ज, सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सवर हा कच्चा माल सहजगत्या सापडतो. आता संपूर्ण खात्री करून घ्यावी आपल्याला त्या विषयातलं एक अक्षरही कळत नाही. मग त्या विषयावर गूगल वापरून माहिती मिळवावी. एकाच वेळा चार वेगवेगळ्या वेबसाईट्स उघडून चारही ठिकाणचे वेगवेगळे परिच्छेद एक आड एक वाचावेत. अर्थातच ती आपल्याला कळणार नाही याचीही खात्री करावी. आता पूर्वतयारी पूर्ण झाली. किंवा आपल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) जन्मापूर्वी घडलेल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) घटनांबद्दल कुठूनतरी माहिती मिळवावी. माहिती अर्धवटच असेल याची खात्री करावी.