सही रे सही -भाग १
गेल्या वर्षी रामदास यांच्या हापीसात गेलो होतो. बोलता बोलता रामदास यांनी माझा सह्यांचा संग्रह मिसळपाव वर प्रकाशीत करण्याचा मनसुबा प्रगट केला. (रामदास यांनी श्रीनिवास विनायक कुळकर्णींच्या हस्ताक्षराचा नमुना हरवला होता इथून विषयाला सुरुवात झाली.)मध्यंतरी कामाच्या गडबडीत मी पण विसरलो होतो.गेल्या शनिवारी भेट झाली तेव्हा हरदासाची कथा मूळपदावर आली.सही रे सहीचा हा पहीला भाग तुमच्या समोर ठेवतो आहे.
मिसळपाव